पुणे

अजित पवार यांचे नाव रिंगरोडला देण्याचे मागणी

CD

पौड, ता. १३ : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यात रिंग रोडसह अनेक विकासकामे काम प्रगतिपथावर होती. परंतु त्यांच्या अकाली निधनामुळे सर्वसामान्य नागरिकांना धक्का बसला. त्यांची स्मृती कायम राहावी, यासाठी विकासाला चालना मिळणाऱ्या रिंगरोडला ‘स्व. नामदार अजित पवार रिंग रोड’ असे नाव द्यावे, अशा मागणीचा ठराव मंजूर करण्याची मागणी भोरचे आमदार शंकर मांडेकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय आणि उपमुख्यमंत्री व पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे विभागीय आयुक्त कार्यालयात झाली. त्यावेळी मांडेकर यांनी ही मागणी केली. तसेच, मतदारसंघातील राजगड, तोरणा, रायरेश्वर हे राज्य संरक्षित किल्ले येत आहेत, परंतु या किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झालेली आहे. तसेच, रायरेश्वर किल्ल्यावर चढताना रस्ता अथवा पायऱ्या सुव्यवस्थित करण्यासाठी निधीची तरतूद करण्याची मागणी मांडेकर यांनी केली. तसेच, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून महावितरणला रोहित्र बसवण्यासाठी निधी दिला जातो, परंतु ती कामे वेळेवर केली जात नाही. तसेच, माझा मतदारसंघ तीन तालुक्यांसह पुणे व पिंपरी शहरातील भाग येत आहे. परंतु, महावितरणच्या कामांसाठी पाच ते सहा कोटी रुपयांची तरतूद केली जाते. परंतु, ही तरतूद अपुरी पडत असून, प्रत्येक तालुक्यासाठी 5 कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणीही मांडेकर यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Live-in Partner vs Dowry Law: पत्नी नाही, तरी गुन्हा? लिव्ह-इन पार्टनरलाही हुंडा कायद्याचा हक्क? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला थेट सवाल

Pune RTO : बेशिस्त वाहनचालकांना दणका! पुण्यात ‘आरटीओ’कडून ३ हजार ६०० वाहन परवाने निलंबित

मुख्यमंत्री फडणवीस आठवड्याभरात दुसऱ्यांदा दिल्ली दौऱ्यावर; आधी शहांना भेटले, आता भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची घेतली भेट

मला काहीही झालं तरी तू... हार्दिक जोशीने सांगितला तो प्रसंग; म्हणाला- 'अक्षयाने १२- १३ मालिका सोडल्या...'

Horoscope: यंदा ३०० वर्षांनंतर १२ दुर्मिळ योग आणि ४ राजयोगांचा महासंयोग; महाशिवरात्रीला या राशींचं नशीब उजळणार!

SCROLL FOR NEXT