पुणे

सोशल मिडीयावर विजयाचा ‘डिजिटल’ जल्लोष

CD

पौड, ता. १४ : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे हायटेक प्रचाराचा धुराळा तळगाळात लोकांना पाहायला मिळाला. प्रचाराबरोबरच विजयी उमेदवारांचा डिजिटल जल्लोषही सध्या मतदारांच्या करमणुकीचा विषय झाला आहे. विजयाच्या फ्लेक्सबरोबरच जल्लोषाच्या रिल्सही मोबाइलवर धुमाकूळ घालत आहेत. फ्लेक्स, रिल्समधून बऱ्याच ठिकाणी पराभूत उमेदवाराला डिवचण्याचेही काम विजयी उमेदवार आणि समर्थकांनी केले आहे. विजयाच्यावेळी केलेली गुलालाची उधळण, मिरवणुका, बेफाम डान्स, घोषणाबाजी, चित्रपटातील गाण्यांवर, डायलॉगवर केलेल्या रिल्समुळे सोशल मिडीयावर विजयाचे टशन अजूनही सुरूच आहे.
निवडणुका आणि सोशल मिडिया म्हणजे एकच नाण्याच्या दोन बाजू, असे राजकारणाचे एक समीकरणच जणू तयार झाले आहे. मतदारांपर्यंत पोचण्याचे डिजीटल माध्यम म्हणून सोशल मिडीयाकडे पाहीले जाते. त्यामुळेच व्हॉटस ॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्युबद्वारे मतदारांपर्यंत आपली ओळख पोचविण्याचे काम उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी केले. त्यामुळेच यावेळच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीला डिजिटल स्वरूप प्राप्त झाले होते.
मतमोजणीनंतर सोमवारपासून (ता. 9) सोशल मिडीयावरच उमेदवारांच्या विजयाचे टशन सुरू आहे. विजयी उमेदवारांच्या विजयाचे फ्लेक्स जागोजागी झळकले आहेत. या फ्लेक्सवर उमेदवाराच्या विजयाच्या अभिनंदनाबरोबच किंगमेकर, हेडमास्टर, पॅटर्न, गुलाल आमचाच, जिरवली, बाईन हरवल, आमचीच हवा असे शब्द मोठ्या टाईपमध्ये टाकून पराभूत उमेदवारांना किंवा त्यांच्या समर्थकांनाही डिवचण्याचे काम फ्लेक्सद्वारे केले गेले.
उमेदवारांच्या विजयाच्या वाजत गाजत काढलेल्या मिरवणुका, गुलांलाची केलेली उधळण, घोषणाबाजी यांच्याही एडिट केलेल्या रिल्समुळे मतदारांची चांगलीच करमणूक झाली आहे. हिंदी, मराठी चित्रपटातील वर्चस्व दाखविणारे डायलॉग काही उमेदवारांनी आपल्या रिल्समध्ये टाकून चित्रपटासारखे प्रसंग तयार केले आहेत. विजयी झाल्याची वार्ता मिळताच अनेकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहिले, उमेदवारासह समर्थकांचा कंठ दाटून आला. महिलामधील भावनिक वातावरणाचा कल्लोळ, असे अनेक प्रसंग देखील रिल्समध्ये चितारले. असे संपादित केलेले रिल्सही अनेक मतदारांना भावत आहेत. मतमोजणी होऊन सहा दिवस झाले तरी विजयाचे डिजिटल टशन सध्या सर्वत्र सुरू आहे.

अजितदादांच्या मिश्किल क्लिपचीही जोड
विजयाच्या रिल्सने तर प्रत्येकाच्याच मोबाइलचा डेटा भरला गेला आहे. विजयी उमेदवारांच्या जल्लोषाचे अनेक व्हिडिओ, रिल्स, मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. या व्हिडिओ, रिल्सला मराठी, हिंदी आणि साऊथ इंडियन गाण्याची जोड दिली गेली आहे. काही रिल्समध्ये चित्रपटातील डायलॉगही जोडले गेलेत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणाच्या काही मिश्किल क्लिपचाही जोड दिला आहे. या सर्व रिल्समध्ये उमेदवाराने स्वतःचे मतदारांमध्ये कसं वजन आहे. मीच कसा या भागाचा दादा आहे. विरोधकांची कशी जिरवली, हेच मतदारापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: विजय आपलाच, पण त्याच्यापासून सावध राहा..., हरभजन सिंगचा भारतीय संघाला इशारा

Railway News: सामान्य डब्यांनाही एसीसारखी स्वच्छता असणार! भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय; ट्रेन प्रवासात ऐतिहासिक बदलाची नांदी

Mumbai News: अतिक्रमण काढण्यास महापालिका अपयशी, उच्च न्यायालयाचे ताशेरे; महापालिका आयुक्तांना आदेश

14,50,00,000 रुपये ! अभिषेक बच्चनची लक्झरी अपार्टमेंट विकून बक्कळ कमाई ; सिनेमे अपयशी पण बिझनेसमध्ये यश

Latest Marathi News Live Update : IND vs PAK सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट टीम सरावासाठी कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर दाखल

SCROLL FOR NEXT