पुणे

शेरे शाळेत भरला आठवणींचा वर्ग

CD

पौड, ता. २६ : शेरे (ता. मुळशी) येथील मामासाहेब मोहोळ विद्यालयात २००३मधील दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच पार पडला. तेवीस वर्षापूर्वीच्या वर्गमित्रांसह त्याकाळात शिकविणाऱ्या शिक्षकांच्या गाठीभेटी झाल्याने कडू-गोड आठवणींना उजाळा यावेळी मिळाला. ज्या शाळेमुळे आपल्या जीवनाचे सोने झाले, त्या शाळेतील भौतिक सुविधांसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन विद्यार्थ्यांनी दिले.
दहावीची परीक्षा दिल्यानंतर काही विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी, काही नोकरी व्यवसायानिमित्त तर काही लग्नानंतर एकमेकांपासून दुरावले गेले होते. सोशल मिडियाच्या माध्यमातून काहीजण एकमेकांच्या संपर्कात होते. या वर्गातील संदीप लांडगे, राजेंद्र ठोंबरे, विनायक ढमाले, अजय वैराट, रवींद्र सांगळे, स्वप्निल कडू, सचिन मराठे यांनी पुढाकार घेत वर्गमित्रांचा व्हॉटस ॲप ग्रुप तयार करून शाळेत स्नेहमेळावा घेण्याचे नियोजन केले. त्यासाठी सेवानिवृत्त शिक्षकांशी संपर्क साधून त्यांना निमंत्रण दिले.
यावेळी माजी मुख्याध्यापक विष्णुपंत ढोबळे, ए. एस. भंडारी, दत्तात्रेय वणवे, मेघा ढगे, एल. एम. गायकवाड, यू. जी. सोनवणे, वाय. के. रूपनवर, प्रभारी मुख्याध्यापक अनिल काळभोर, विजय ढगे, विलास लांडगे, मारुती शेळके आदी उपस्थित होते. काळभोर यांनी प्रास्ताविकात विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे विद्यालयास विविध प्रकारच्या भौतिक सुविधांसाठी मदत करण्याचे आवाहन केले.
राजेंद्र ठोंबरे, विनायक ढमाले, संदीप ठोंबरे, अनिल ठोंबरे, अंजना मालुसरे, रूपेश आगळे, कल्याणी शिळीमकर यांनी तेवीस वर्षापूर्वीच्या वर्गातील शिक्षकांनी केलेल्या शिक्षेच्या, कौतुकाच्या आठवणी सांगितल्या. तर वणवे, ढोबळे, भंडारी, ढगे, गायकवाड, सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना सुखी जीवनाचा मंत्र दिला. यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी स्पिकरची मशीन भेट दिली. सूत्रसंचालन संदीप लांडगे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT