पुणे, ता.२६ : शेतात गुरे घुसल्याचा फोटो दाखविल्याचा रागातून पौड विठ्ठलवाडी (ता.मुळशी) येथे शेतकऱ्याला भावकीतीलच चौघांनी शिवीगाळ, दमदाटी करीत काठ्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. सुरेश निवृत्ती पिंगळे (वय ५५) असे मारहाण झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
पिंगळे यांना मारहाण करणाऱ्या रामदास तुकाराम पिंगळे, लक्ष्मण तुकाराम पिंगळे, प्रणव लक्ष्मण पिंगळे, ओंकार लक्ष्मण पिंगळे (सर्व रा.पौड विठ्ठलवाडी ) यांच्यावर पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
रामदास पिंगळे यांची गुरे सुरेश पिंगळे यांच्या शेतात गेली. सुरेश यांनी मोबाईलमध्ये त्याचा फोटो काढून तो रामदास यांना दाखवत गुरामुळे माझ्या शेतीचे नुकसान होत आहे, त्यांच्याकडे लक्ष द्या असे समजावून सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी सुरेश शेतात गेले असता रामदास, लक्ष्मण, प्रणव, ओंकार यांनी सुरेश यांना शिवीगाळ, दमदाटी करीत काठ्यांनी मारहाण केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.