पुणे

रिंगरोडच्या कामांबाबत तक्रारींचा पाढा

CD

पौड, ता. ६ : मुळशी तालुक्यातील रिंगरोडसाठी होणाऱ्या अवैध उत्खननामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून, रॉयल्टी न भरल्यास थेट शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर बोजा चढवण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. पौड येथील खरीप हंगाम व पाणीटंचाई आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
मुळशी पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या या बैठकीत कातरखडक, आंधळे यांसह विविध गावांतील नागरिकांनी रिंगरोडच्या कामाबाबत तक्रारींचा पाढा वाचला. मुरूम आणि मातीची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी स्पष्ट केले की, शेतातून माती काढताना रॉयल्टी भरली नसल्यास त्याचा दंड थेट शेतकऱ्याला भरावा लागेल.
या बैठकीला आमदार शंकर मांडेकर, तहसीलदार विजयकुमार चोबे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, सभापती मंदा शेळके, उपसभापती दगडूकाका करंजावणे यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य, सरपंच आणि ग्रामसेवक उपस्थित होते. बैठकीत खरीप हंगाम नियोजनासह पाणीटंचाईचाही सविस्तर आढावा घेण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs PBKS Live: पंजाबच्या यष्टिरक्षकाने सहकाऱ्याला चेंडू फेकून मारला... मग काय, गडी पेटला अन् पुढच्या ३ चेंडूंत धिंगाणा घातला

Ambajogai News : स्वारातीच्या पदव्युत्तर विद्यार्थ्याने संपविले जीवन; कारण अस्पष्ट

IPL 2026 : हार्दिक पांड्याच्या प्रकृतीबाबत मोठे अपडेट्स, MI vs RR सामना खेळणार की नाही? मुंबईच्या कोचचे वैभव सूर्यवंशीबद्दलही विधान

Nanded Crime News: 3 दिवसात ५ खून, नांदेड हादरलं, अशोक चव्हाण आक्रमक..

Baramati By Election: बॅनरबाजी चर्चेत, आदिती तटकरे चांगल्याच चिडल्या...

SCROLL FOR NEXT