पुणे

पौड येथे महिलांना इलेक्ट्रिक रिक्षांचे वाटप

CD

पौड, ता. १२ : पौड (ता.मुळशी) येथे झालेल्या कार्यक्रमात कासारअंबोली आणि हिंजवडी येथील महिला बचत गटांना ‘उमेद-सावित्री फिरते विक्री केंद्र’ म्हणून दोन इलेक्ट्रिक रिक्षांचे वाटप केले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (उमेद) जिल्हा परिषदेने मुळशी तालुक्यातील हा उपक्रम राबविला जाणार आहे. महिलांच्या उत्पादनांना आता हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.
पंचायत समितीच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला झाला. महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची गावात आणि शहरात प्रदूषणमुक्त पद्धतीने विक्री व्हावी, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
यावेळी माजी सभापती महादेव कोंढरे, उपसभापती दगडूकाका करंजावणे, सदस्य राहुल पवळे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, सहायक गटविकास अधिकारी भालेराव, गटशिक्षणाधिकारी संग्राम पाटील यांच्यासह विविध बचत गटांतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या फिरत्या विक्री केंद्रामुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.

04834

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price Today : एलपीजी दरवाढीनंतर पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या महाग झाले की स्वस्त?

Akola: धान्याची पोती उचलणाऱ्यांच्या घरातच उपासमारी; ११० माथाडी कामगारांची मजुरी रखडली; कुटुंबीयांवर आर्थिक संकट

Maharashtra:तळकोकणात आनंदसरी;मॉन्सूनचे सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांत आगमन

New Marathi releases : खेडूत ते क्रिकेटर, टेक-३, राजूभाई बीएएमएस आणि सिंधी; प्रेरणादायी प्रवासकथांच्या नव्या मराठी पुस्तकांची ओळख

French Open Women's Champion: 19 वर्षीय मीराचा इतिहास! फ्रेंच ओपन जिंकत केला असा पराक्रम, जो अनेक दिग्गजांनाही जमला नाही

SCROLL FOR NEXT