पौड, ता. १७ : पौड (ता.मुळशी) येथे दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या स्वतंत्र इमारतीचे भूमिपूजन रविवारी (ता. १९) सकाळी १०.३० वाजता होणार आहे. तांत्रिक अडचणी दूर झाल्याने १२ कोटी १२ लाख रुपये खर्चाच्या या भव्य वास्तूचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. संभाजी बलकवडे, उपाध्यक्ष ॲड. संजय मारणे यांनी दिली.
मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डोंगरे यांच्या हस्ते या इमारतीचा कोनशिला समारंभ पार पडणार आहे. यावेळी न्यायमूर्ती संदीप मारणे, न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर, पुणे जिल्हा सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, पौडचे दिवाणी न्यायाधीश सागर मोहिते, आमदार शंकर मांडेकर तसेच तालुक्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. भूमिअभिलेख कार्यालयाच्या शेजारी असलेल्या जिल्हा परिषदेच्या भाडेतत्त्वावरील जागेत सध्या हे न्यायालय सुरू आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती, मेघालयाच्या प्रमुख न्यायाधीश रेवती मोहिते-डेरे आणि मुळशीचे भूमिपुत्र न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या पुढाकारामुळे पौड येथे गतवर्षीपासून पूर्णवेळ दिवाणी आणि फौजदारी न्यायालय सुरू झाले. त्यासाठी तालुक्यातील स्थानिक वकील, आजीमाजी लोकप्रतिनिधी यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. स्वतंत्र इमारतीसाठी चार वर्षांपूर्वीच राज्य सरकारने प्रशासकीय निधी मंजूर केला होता. इमारतीसाठी १२ कोटी १२ लाख तर निवासस्थानासाठी एक कोटी ७७ लाख रुपये मंजूर आहे. पौड येथे २० गुंठे जागेवर जिल्हा न्यायाधीशांच्या नावाने सातबारा दप्तरी नोंदही आहे; परंतु त्यात काही तांत्रिक अडचणी उद्भवल्या होत्या. त्या दूर झाल्याने इमारत बांधकामाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.