पुणे

दारवलीतील अपघातात एकजण ठार

CD

पौड, ता. २७ : दारवली (ता. मुळशी) येथील धनवेवाडी फाटा येथे महामार्गाच्या कडेला असलेल्या लोखंडी कठड्याला मोटार धडकली. यामुळे झालेल्या अपघातात एक ठार तर एकजण गंभीर जखमी झाला. हा अपघात सोमवारी (ता. २७) पहाटे साडेतीनच्या सुमारास झाला.
अपघातात अनिकेत लक्ष्मण पोंगडे (वय ३५, रा. धनकवडी, पुणे) याचा मृत्यू तर सिद्धेश शांताराम पवार (रा. पौड फाटा, कोथरूड, पुणे) हे गंभीर जखमी झाले.
पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिग्नेश भरत सापरिया (रा. कर्वेनगर, पुणे) हे मोटारीने (क्र. एमएच १२ एक्सटी ५०६९) कोकणातून पुण्याच्या दिशेने येत होते. त्यांच्या शेजारी सिद्धेश पवार बसले होते तर सिद्धेशच्या पाठीमागे अनिकेत पोंगडे बसले होते. पहाटेच्या सुमारास दारवलीच्या धनवेवाडीच्या वळणावर भरधाव मोटारीने रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या लोखंडी संरक्षक कठड्याला जोरदार धडक दिली. यावेळी संरक्षक कठड्याचा लोखंडी ॲंगल पाठीमागच्या बाजूने आत घुसला. त्यामुळे अनिकेतचा मृत्यू झाला. अपघाताप्रकरणी विजय राजेंद्र भोईर (वय ४५, रा. नारायण पेठ, पुणे) यांनी पौड पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Axar Patel Reaction : मलाच काही समजत नाहीए...! RCB ने दिलेल्या धक्क्यानंतर अक्षर पटेल गोंधळला; म्हणतो, आता काय पुढे...

Pune Charity Commissioner : पारदर्शक न्यायदान हाच न्यायव्यवस्थेचा कणा : पुणे विभागाचे सह धर्मादाय आयुक्त दिनेश कोठलीकर यांचा कार्यभार स्वीकारताना निर्धार

Virat Kohli Record! विराट कोहलीने IPL इतिहासात कोणालाच न जमलेला विक्रम केला, पहिला फलंदाज ठरला; रोहित खूपच लांब राहिला

Mohol Crime : पैशाच्या वादातून एकाचा खून, एक गंभीर जखमी; आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

IPL 2026 Point Table: दक्षिणेचा 'दिल्लीवर' कब्जा! RCB चा मोठा विजय, दोन दिवसांपूर्वी २६४ धावा करणारा DC आज ७५ धावांत तंबूत

SCROLL FOR NEXT