पुणे

मुळशी धरणग्रस्तांना पोलिसांनी अडवले

CD

पौड, ता. २ : मुळशी धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मुंबई- बंगलोर महामार्ग अडविण्यासाठी चाललेल्या मुळशी धरणग्रस्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बावधन पोलिसांनी घोटावडे फाटा येथूनच ताब्यात घेतले. त्यामुळे आंदोलनस्थळावरील कार्यकर्ते पांगले. तथापि जोपर्यंत मुळशी धरणग्रस्तांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आपला लढा चालूच ठेवणार असल्याचे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अमित कंधारे यांनी सांगितले.
धरणग्रस्त कृती समितीच्या माध्यमातून कंधारे यांनी सोमवारी (ता. २) मुंबई- बंगलोर महामार्ग अडविण्याचा इशारा दिला होता. तथापि हिंजवडी ते शिवाजीनगरला जाणाऱ्या मेट्रो लाइनचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी ऑनलाईन उद्‍घाटन होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहे. या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी कंधारे यांना घोटावडे फाटा येथेच अडवले. त्यांच्या समवेतच्या कार्यकर्त्यांना ते पिरंगुट पोलिस चौकीत घेऊन गेले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी बुचडे, माजी पंचायत समिती सदस्य भगवान नाकती, अनंता कंधारे, रमेश पडवळ, संजय हुंडारे, सचिन कोंढाळकर, दत्ता दिघे, गोविंद सरूसे, विशाल शेळके, अनंता सोनार, नीलेश धनावडे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त प्रदीप जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे, बावधनचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक परवेज शिकलगार, उपनिरीक्षक अनिल बत्तीशे यांनी आंदोलकांना समज देऊन नंतर सोडून दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राजकीय संघर्ष नव्या वळणावर; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; ‘हिम्मत असेल तर...!’

Nanded Crime News: जागेच्या वादातून टेम्पो अंगावर घातल्याचा आरोप; अरुण कुंटे यांच्या खूनप्रकरणी दोघांना अटक

Latest Marathi News Live Update : पुण्यात चक्रीवादळाचा प्रभाव! पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, तापमानात थेट ८ अंशांची घट; 'यलो अलर्ट' जाहीर

NCP leaders meet Amit Shah: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चाललंय काय? वरिष्ठ नेत्यांनी अमित शाहांची भेट घेतल्यानंतर पक्षाचं स्पष्टीकरण; भेट नेमकी कशासाठी?

Dharashiv News: भूममध्ये पाइपलाइनच्या कामादरम्यान पोकलेन अंगावर; मजुराचा मृत्यू, मदतीसाठी ग्रामस्थ आक्रमक

SCROLL FOR NEXT