पुणे

राहूत शंभू महादेवाला जलाभिषेक

CD

राहू, ता. २३ : हर हर महादेवाच्या जयघोषात मुळा-मुठा नदीच्या कडेला असणाऱ्या उंच अवघड कडा पार करीत तीन तासांच्या अवधीनंतर राहू (ता. दौंड) येथील पंचक्रोशीतील आराध्यदैवत श्री शंभू महादेवाला आणि पिंपळगाव येथील ग्रामदैवत सिद्धेश्वराला हजारो शिवभक्तांनी जलाभिषेक घातला. यात्रेला बुधवार (ता. २२) पासून सुरूवात झाली. पहाटेपासून अनेक शिवभक्तांनी अभिषेक केला. त्यानंतर महापूजा झाली. सकाळी अकराच्या सुमारास ग्रामदैवत शंभू महादेवाच्या मानाच्या कावडीसह सहा कावडी मुळा-मुठा नदीच्या पात्रात घागरीत पाणी आणण्यासाठी गेल्या. दुपारी एकच्या सुमारास कावडी घागरीत पाणी घेऊन आल्यानंतर अवघड उंच कडा पार करत जलाभिषेक केला. तेव्हा हजारो शिवभक्तांनी हर.. हर.. महादेवाचा गजर केला. त्या वेळी हजारो शिवभक्त भक्तीच्या महासागरात न्हाऊन गेला होता.
या वेळी राहू ग्रामपंचायत, समीर जगताप, स्वप्नील जगताप, आनंद मार्केट, समर्थ किराणा यांच्या वतीने मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. समीर आतार, मोहम्मदभाई आतार यांच्यावतीने फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPF Insurance: PF खातेदारांना मिळतो तब्बल 7 लाखांचा मोफत विमा; अनेकांना याची माहितीच नाही; जाणून घ्या पात्रता आणि नियम

5-4-5 Walking Pattern: फक्त 15 मिनिटं चालल्याने झटक्यात कॅलरीज बर्न होतात? काय आहे ही '5-4-5 वॉकिंग पॅटर्न' जो सगळ्यांनाच आवडतोय

Latest Marathi News Live Update : पुढील ४-५ दिवस संपूर्ण राज्यात वादळी वारे आणि पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

UP: अखिलेश यादव यांच्या लेकीवरील 'त्या' कमेंट्सवर CM योगी आक्रमक! म्हणाले, "मुलगी कोणाचीही असो, तिचा अपमान खपवून घेणार नाही!"

E-commerce impact on farmers: शेतातून थेट ग्राहकांपर्यंत, ई-कॉमर्स ऑपरेशन्स नेटवर्क शेतकऱ्यांसाठी ठरतंय वरदान

SCROLL FOR NEXT