राहू, ता. १९ : दौंड तालुक्यातील राहू येथील ग्रामदैवत शंभू महादेवाच्या मंदिरात भक्तिमय वातावरणात शांतिनाथ महाराज यांचे शिष्य-सिद्ध सद्गुरू गोपालनाथ महाराज यांच्या हस्ते गणेश मूर्ती, शिवलिंग, पार्वती मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
यावेळी आमदार राहुल कुल, कांचन कुल, शिवाजी सोनवणे, बंडू नवले, किसन शिंदे, माजी सरपंच दिलीप देशमुख, बापूसाहेब देशमुख, चिमाजी कुल, उद्धव कुल, भगवान झरांडे, बाजीराव शिंदे, रामदास नवले, भाऊसाहेब चव्हाण, गणेश चव्हाण, लक्ष्मण कदम, सुरेश सोनवणे, दिलीप जगताप, शंकर सोनवणे, रामभाऊ कुल, प्रशांत काका कुंटे, सुखदेव बिराजदार, शंभू महादेव पालखी सोहळ्यातील विश्वस्त मंडळांसह शंभू भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, पारंपरिक वाद्यांसह, डीजेच्या भक्तिमय वातावरणात गावातून मूर्तींची भव्य मिरवणूक काढण्यात आली. सकाळी होमहवन करण्यात आले. गुरुवारी सकाळी मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करून धार्मिक विधी करण्यात आला. दिगंबर महाराज जाधव यांचे कीर्तन झाले. त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसाद झाला. हजारो शंभू भक्त हर हर महादेवाच्या जयघोषात तल्लीन झाला होता.
सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत जमा
ग्रामदैवत शंभू महादेव मंदिरात मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठापना करण्यात आल्या. दरम्यान, राहू येथील युवक कार्यकर्त्यांनी व्हाट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक, स्टेटसच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्याचे आवाहन केल्यानंतर राहू परिसरातील ग्रामस्थ व शंभू भक्ताने स्वच्छेने धार्मिक कार्यासाठी स्वच्छेने मदत झाली, असे संयोजक मंडळींनी सांगितले.