पुणे

दौंडच्या पश्चिम पट्ट्यात दाट धुक्याची चादर

CD

राहू, ता. ९ : पांगरूनी धुक्याची चादर.. लाली हलकी आभाळी आली.. शीर शिरली लहर थंडीची जराशी.. धरणीला थोडी करून आली.. कवी अतुल सोळस्कर यांच्या काव्यपंक्तीनुसार दौंडच्या पश्चिम पट्ट्यासह राहूबेट परिसरात सोमवारी (ता. ८) आणि मंगळवारी (ता. ९) पहाटे साडेपाच वाजल्यापासून सकाळी साडेआठ वाजेपर्यंत दाट धुक्याची चादर पसरली होती. पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास उशिरा दाट झाडीतून सूर्यदर्शन झाले.
दाट धुक्यातून वाघोली- राहू- मार्गे पारगाव रस्त्यावरून वाहतूक धुक्यामुळे संथगतीने सुरू होती. दाट धुके असल्यामुळे चारचाकी, दुचाकी गाड्यांची हेडलाईट, तसेच पार्किंग लाइट सुरू ठेवून वाहतूक सुरू होती. दाट धुक्यामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणात दवबिंदू साचले होते. ऊस, डाळिंब, इतर तरकारी पिके, तसेच फळबागांना दाट धुक्याचा फटका बसण्याची शक्यता कृषी विभागाच्या वतीने वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, वाघोली- राहू- पारगावमार्गे पीएमपीएल बससेवा सुद्धा संतगतीने सुरू होत्या.

03277

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Iran Policy : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का ! अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्ध युद्ध थांबवण्याचा प्रस्ताव मंजूर

दिग्गज क्रिकेटपटूचे वाढदिवशीच निधन... होणाऱ्या पत्नीच्या निधनाची बातमी कळूनही संघासाठी उतरले होते मैदानात

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे नालासोपारा पूर्वेतील तुळींज पोलीस ठाण्यातही पाणी साचले

Climate Change Health Impact: हवामान बदलाचा आरोग्याला फटका! ताप, सर्दी-खोकला आणि श्वसनविकारांच्या रुग्णांत मोठी वाढ

4 वर्षांचा प्रवास थांबणार, स्टार प्रवाहवरील 'ही' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, मुख्य नायिकेची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT