पुणे

माणसं मेल्यावर पिंजरे लावणार का?

CD

राहू, ता. ९ : राहू (ता. दौंड) येथील परिसरात बिबट्याची दहशतीमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. यामुळे परिसरात वन विभागाने तातडीने पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांतर्फे करण्यात येत आहे. मात्र, वारंवार पत्र व्यवहार करून देखील वन विभाग याकडे सोयिस्कर दुर्लक्ष करत आहे. यामुळे ‘माणसं मेल्यावर पिंजरे लावणार का?’ असा संतप्त सवाल राहू बेट परिसर, खामगाव, पिंपळगाव परिसरात नागरिक करीत आहेत.
मोहन राजेंद्र कुल यांच्या घरासमोरून मंगळवारी (ता.९) बिबट्याने भर दुपारी येऊन कोंबड्या फस्त केल्या. बिबट्याने नांदूर येथील बोराटे वस्ती जवळील बापू थोरात यांच्या दोन शेळ्या सोमवारी (ता.८) मध्यरात्री ठार केल्या. बिबट्याने अशोक घुले यांची एक मेंढी ठार केली.
भर दिवसा राहू बेट परिसर, खामगाव, नांदूर परिसरात बिबट्याचे भर दिवसा दर्शन होऊ लागल्यामुळे शेतात काम करणारे मजूर देखील कामावर येत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. राहू-दहिटणे रस्त्यावर बिबट्यासह बछडे वावरत असल्याचे शिवराम शिंदे यांनी सांगितले. त्यांचा कुत्रा देखील बिबट्याने फस्त केल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे पिंजरा लावण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय कुल, नांदूरचे पोलिस पाटील प्रवीण बोराटे, शेतकरी अशोक घुले यांच्यासह राहू आणि नांदूर येथील ग्रामस्थांनी केली आहे. मात्र, पिंजरा लावण्यास वन विभागाकडून सोयीस्कर टाळाटाळ होत आहे, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, शेतामध्ये अनेक ठिकाणी बिबट्याच्या पायाचे ठसे देखील शेतकऱ्यांना आढळून आले आहे. खामगाव फाटा ते खामगाव तसेच गाडोमोडी चौक ते तांबेवाडी दरम्यान रस्त्याच्या कडेला बिबट्या वावरताना दिसला. गाडीच्या उजेडामुळे त्याने उसाच्या शेताकडे धूम ठोकली. असे येथील नागरिकांनी सांगितले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने पिंजरे लावण्यात यावे. अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Iran Policy : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का ! अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्ध युद्ध थांबवण्याचा प्रस्ताव मंजूर

दिग्गज क्रिकेटपटूचे वाढदिवशीच निधन... होणाऱ्या पत्नीच्या निधनाची बातमी कळूनही संघासाठी उतरले होते मैदानात

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे नालासोपारा पूर्वेतील तुळींज पोलीस ठाण्यातही पाणी साचले

Climate Change Health Impact: हवामान बदलाचा आरोग्याला फटका! ताप, सर्दी-खोकला आणि श्वसनविकारांच्या रुग्णांत मोठी वाढ

4 वर्षांचा प्रवास थांबणार, स्टार प्रवाहवरील 'ही' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, मुख्य नायिकेची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT