दौंड तालुक्याचे आयडॉल
आपल्याकडे असणारा अंगभूत हुशारपणा व कुशाग्र बुद्धिमत्ता आणि सर्वसामान्य जनतेशी जोडलेली नाळ यांचा पिढीजात वारसा आमदार राहुलदादांना मिळाला आहे. त्यामुळे ते तालुक्यातील इतर नेत्यांपेक्षा उजवे ठरतात. त्याच कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर दौंड तालुक्यातील युवकांसाठी आमदार राहुलदादा एकप्रकारे युथ आयकॉन ठरले आहेत. उमदे व्यक्तिमत्त्व, प्रभावी वकृत्वशैली, समोरच्याला आपलेसे करणारे हास्य, यामुळे राहुलदादा युवकांच्या गळ्यातील ताईत ठरले आहेत. इतर राजकारण्यांप्रमाणे पारंपारिक राजकारण न करता त्यांनी आपले वेगळेपण सिद्ध केले आहे.
- शरद कोळपे, उपसभापती, बाजार समिती दौंड
- संतोष आखाडे, संचालक, बाजार समिती दौंड आणि गारवा उद्योग समूह
दौंड तालुक्याचे कार्यक्षम आमदार राहुलदादा कुल यांचा आज 30 ऑक्टोबरला वाढदिवस. त्यांनी सन 2014, 2019 व 2024 मध्ये आमदारकीची मिळवली. विजयाची त्यांनी हॅटट्रिक केली. राहुलदादा यांची विधानसभेमध्ये कामकाज करत असताना भाषणे अत्यंत अभ्यासपूर्ण असतात. त्यांची कामाची पद्धत वाखाणण्याजोगी आहे. आपल्या तालुक्यात कोणते प्रश्न जास्त महत्त्वाचे आहेत, याची त्यांना पूर्णपणे जाणीव असते. त्याप्रमाणे ते प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा पाठपुरावा करत असतात. आमदार राहुलदादा कुल यांच्या चाणाक्ष बुद्धिमत्तेचे प्रतीक म्हणजे अष्टविनायक मार्ग आहे. दौंड तालुक्यात अष्टविनायकांतील एकही गणपती नसताना अष्टविनायक मार्गातील सर्वात जास्त अंतराचा रस्ता हा दौंड तालुक्यातून जात आहे. या रस्त्याचा निश्चितपणे दौंड तालुक्याला फायदाच होणार आहे.
दौंड तालुक्यामध्ये स्वाभिमानाची पहिली ठिणगी सन १९९० मध्ये कर्मयोगी स्व. आमदार सुभाषअण्णा कुल यांच्या रूपाने पेटली होती. सन २००१ मध्ये अण्णांच्या अकाली निधनामुळे अनपेक्षितरित्या राजकारणात आलेल्या राहुलदादांनी तोच स्वाभिमान दौंडकरांमध्ये जागृत ठेवला आहे. ४ जुलै २००१ रोजी स्व. आमदार सुभाषअण्णा कुल यांचे अकाली निधन झाले, त्यानंतर तालुक्याची धुरा माजी आमदार श्रीमती रंजनाताई कुल व राहुलदादा कुल यांच्या खांद्यावर आली. राजकारणाचा कुठलाही अनुभव नसताना त्यांनी ती धुरा समर्थपणे सांभाळली. आणि आज तालुक्याला विकासकामांमध्ये वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. अण्णांच्या निधनानंतर तालुक्यामध्ये पोकळी निर्माण झाली होती, ती भरून काढण्याचे काम आमदार राहुलदादा कुल यांनी केले. अण्णांच्या निधनानंतर अण्णांच्या जुन्या सहकारी मंडळींनी बंड केले, परंतु तरीही न डगमगता सगळ्या विरोधकांना तोंड देत धीरोदात्तपणे प्रत्येक संकटाला तोंड देत राहुलदादांनी सुभाषअण्णांचा समाजकार्याचा वारसा पुढे चालवला.
स्व. सुभाषअण्णांच्या निधनानंतर अवघ्या २३व्या वर्षी राहुलदादा राजकारणात आले, ५० हजारांहून अधिक सभासद असलेला व अत्यंत अडचणीत असलेला जिल्ह्यातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना असा नावलौकिक असलेल्या भीमा पाटस कारखान्याचा कारभार राहुलदादांनी आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यावेळी ‘प्राणवायूवर असलेला कारखाना हा इतक्या कमी वयात कसा चालवणार?’ असे काळजीपूर्वक वक्तव्य केले होते, परंतु तशाही परिस्थितीत आपल्या हुशारीची चुणुक दाखवत, योग्यवेळी योग्य निर्णय घेत कारखाना हळूहळू अडचणीतून बाहेर काढला. त्यानंतर कारखान्यामध्ये आसवानी प्रकल्प व सहवीजनिर्मिती प्रकल्प चालु केले.
राहुलदादा अजातशत्रू व्यक्तिमत्त्व आहेत, सर्वच राजकीय पक्षांमध्ये त्यांचे मित्र आहेत. अगदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही त्यांचे मित्रत्वाचे संबंध आहेत. या सगळ्याचा फायदा दादा दौंड तालुक्याच्या विकासासाठी चपखलपणे करून घेतात. नुकतीच त्यांनी भीमा पाटस कारखान्यासाठी खास बाब म्हणून राज्य शासनाची मदत मिळवली आणि अशी मदत मिळवणारा भीमा पाटस हा राज्यातला पहिलाच कारखाना आहे, हे विशेष.
आमच्या लाडक्या नेत्याला (दादांना) वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.