राहू, ता. १४ : खामगाव (ता. दौंड) येथे बाल दिनानिमित्त ज्ञानराज पब्लिक स्कूलच्या वतीने खाऊगल्लीचे आयोजन करण्यात आले होते. यास विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
खाऊगल्लीचे उद्घाटन सरपंच योगेश मदने, संस्थेचे अध्यक्ष महेंद्र जगताप, सचिव राजेंद्र जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांना बाजाराची व्यावहारिक माहिती मिळावी, या उद्देशाने संस्थेने हा उपक्रम राबविला. याप्रसंगी युथ कार्यकारी सेवा सोसायटीचे अध्यक्ष अविनाश जगताप, अनिल नागवडे, संचालक कपिल नागवडे, नितीन कुदळे, खजिनदार अनिल शिंगाडे, मुख्याध्यापिका सुमन मकवाना आदी उपस्थित होते.