राहू, ता. ५ : पिंपळगाव (ता. दौंड) येथील नर्मदा शिंदे (वय ८८) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, चार मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पिंपळगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष मच्छिंद्र शिंदे व नारायण शिंदे हे त्यांचे पुत्र होत.