पुणे

राहू, खामगावला शोकसभा

CD

राहू, ता. ३०: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात आकस्मिक निधन झाले. त्यांच्या प्रतिमेला आमदार राहुल कुल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. राहू (ता. दौंड) येथे शुक्रवारी (ता. ३०) शोकसभेचे आयोजन केले होते.
यावेळी आमदार राहुल कुल म्हणाले, ‘‘संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत धक्कादायक आणि क्लेशदायक घटना आहे. स्व. अजितदादांचे कणखर नेतृत्व, प्रशासनावर असलेली पकड आणि जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण नेहमीच आपल्या स्मरणात राहील. राहू, बेट परिसरासह पुणे जिल्ह्याच्या विकासातील त्यांचे योगदान विसरता येणारे नाही.’’
याप्रसंगी शिवाजी सोनवणे, मारुती मगर, भगवान झरांडे, अनिल सोनवणे, सुखदेव चोरमले, शुभांगी किसन शिंदे आदींची मनोगते झाली. याप्रसंगी दिलीप देशमुख, दिलीप जगताप, सुरेश सोनवणे, चिमाजी कुल, सचिन शेलार, अरुण नवले, दिनेश भुजबळ, अमोल कुल, शंकर सोनवणे यांच्यासह राहू खामगाव जिल्हा परिषद गटातील विविध गावचे आजी-माजी पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच, खामगाव (ता. दौंड) येथे अजित पवार यांच्या स्मृतीस अभिवादन करून शोक सभेचे आयोजन केले होते. याप्रसंगी सागर शेलार , योगेश मदने, बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शिंदे, विजय नागवडे, दत्तोबा तांबे, काळूराम नागवडे व ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT