राहू, ता.२३: डुबेवाडी (ता. दौंड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नोव्हेंबरपासून संबंधित शिक्षकाला शाळेत रुजू करण्याचा आदेश देऊन देखील संबंधित शिक्षिका आजतागायत शाळेत रुजू होत नसल्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे गेल्या चार महिन्यांपासून शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळेमध्ये तत्काळ नवीन शिक्षकाची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी मानसन्मान फाउंडेशनचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण डुबे यांच्यासह डुबेवाडी ग्रामस्थांनी केली आहे
येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उपशिक्षिका सुनीता काटम शिक्षिकेची नेमणूक केली असून देखील या शिक्षिका गेल्या चार महिन्यांपासून शाळेत रुजू होत नाही. त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. या शिक्षिका शाळेत रुजू न झाल्यास शाळा बंद आंदोलन करण्याचा इशारा श्रीकृष्ण डुबे यांच्यासह येथील ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे. श्रीकृष्ण डुबे यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, दौंड तहसील कार्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग, ग्रामपंचायत पिलाणवाडी यांच्याकडे ४० ग्रामस्थांच्या स्वाक्षरींसह लेखी तक्रार अर्ज केला आहे.
गेल्या चार महिन्यांपासून शाळेत शिक्षक रुजू न झाल्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षक रुजू न झाल्यास आमची मुले इतर शाळेत आम्ही पाठवण्याचा निर्णय घेणार आहोत.
- श्रीकृष्ण डुबे, शिक्षण प्रेमी
संबंधित शिक्षकाला समज दिली आहे. या शिक्षिका (एस.सी.आर.टी) येथे काम करत आहे. दोन दिवसात शिक्षक शाळेवर रुजू होतील. अन्यथा पर्यायी शिक्षकाचा त्या ठिकाणी त्वरित विचार केला जाईल.
- संजय महाजन, गटशिक्षणाधिकारी, दौंड
राजकीय शिक्षकांचीच संख्या लक्षणीय!
दौंड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच वाड्या वस्तीवरील शाळांमध्ये राजकीय शिक्षकांच्या संख्या लक्षणीय आहे. संबंधित राजकीय शिक्षक हे मोबाईलवर नेहमी व्यस्त असतात. संबंधित शिक्षक शाळेवर कमी आणि राजकीय व्यासपीठावर जादा उपस्थिती असते. कधी वेळेवर हजर राहत नाही. शिक्षक बड्या नेत्यांची मनधरणी करण्यात मग्न असतात त्यामुळे शिक्षण विभागाने अशा चमचेगिरी शिक्षकांची शाळा तपासून तेथील दर्जा तपासावा अशी मागणी राहू परिसरातील शिक्षक प्रेमींकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.