पुणे

राजगुरुनगरमध्ये ६१ विद्यार्थ्यांना विषबाधा

CD

राजगुरुनगर, ता. ९ : राजगुरुनगर (ता. खेड) येथील आदिवासी शिक्षण संस्थेच्या हुतात्मा राजगुरू विद्यालयाच्या ६१ विद्यार्थ्यांना गुरुवारी (ता. ९) शालेय पोषण आहारातील एका पातेल्यातील भात खाल्ल्यावर विषबाधा झाली. विद्यार्थ्यांना पोटदुखीचा आणि मळमळीचा त्रास जाणवू लागल्याने चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने सर्वांची प्रकृती ठीक आहे. आमदार दिलीप मोहिते यांनी रुग्णालयात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
भीमा नदीवरील हुतात्मा राजगुरू पुलाजवळ हे हुतात्मा राजगुरू विद्यालय आहे. विद्यालयातील ५ वी ते ८ वीच्या २१५ मुलांना तीन पातेल्यांतून पोषण आहार दिला जातो. गुरुवारी दुपारी १ वाजता नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना पोषण आहारातील मसालेभात वाढण्यात आला. त्यातील एका पातेल्यातील भाताची साबणासारखी चव लागत होती. त्या पातेल्यातील भात ज्या ज्या मुलांनी खाल्ला, त्यांना पोटदुखीचा आणि मळमळीचा त्रास होऊ लागला. खबरदारीचा उपाय म्हणून त्रास होणाऱ्या ६१ विद्यार्थ्यांना चांडोली ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, असे मुख्याध्यापक अशोक नगरकर यांनी सांगितले.
मुलांना औषध व गोळ्या दिल्या असून, सर्वांची प्रकृती ठीक आहे. चोवीस तास त्यांच्यावर लक्ष ठेवावे लागेल, पण प्राथमिक पातळीवर कोणाची परिस्थिती चिंताजनक वाटत नाही, असे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक महेंद्र गरड यांनी सांगितले.
या प्रकाराने शहरात खळबळ उडाली. पालकांनी रुग्णालयात धाव घेतली. पण, विद्यार्थ्यांना बोलताना पाहून त्यांचा जीव भांड्यात पडला. उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण, तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील, पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे, गटशिक्षणाधिकारी जीवन कोकणे, तालुका आरोग्य अधिकारी इंदिरा पारखे, वैद्यकीय अधिकारी पूनम चिखलीकर आदी रुग्णालयात हजर झाले. चव्हाण यांनी तातडीने सुत्रे हलवून गंभीर परिस्थितीसाठी यंत्रणा सज्ज ठेवली. पण, प्रत्यक्षात तशी वेळच आली नाही. मात्र, पोषण आहार बनविणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पालकांनी केली. संस्कृती महिला स्वयंसहायता बचत गटाकडे या पोषण आहाराचे काम आहे.

पोलिसांनी पंचनामा केला. भाताचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले. विद्यार्थ्यांचे व अध्यापकांचे जबाब घेतले. तपासणी अहवालानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.
राजकुमार केंद्रे, पोलिस निरीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव; यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीत मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Farmers: पंचनामे कागदावर नको, थेट बांधावर करा; महसूलमंत्री बावनकुळे यांचे निर्देश; ग्रामसेवक, कृषी साहाय्यक, तलाठींची उपस्थिती बंधनकारक

आजचे पंचांग 24 सप्टेंबर 2026! प्रदोषामुळे खास दिवस; वाचा शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

Ahilyanagar Ganesh Visarjan : अहिल्यानगरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत लाठीचार्ज; तरुणाचा मृत्यू, आमदार संग्राम जगताप यांचे ठिय्या आंदोलन

Jharkhand Dhuska Recipe: एकदा खाल तर पोहे-उपमाही विसराल! असा बनवा बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ झारखंडी धुस्का

SCROLL FOR NEXT