पुणे

रेटवडी येथील स्मशानभूमीत अघोरी कृत्य

CD

राजगुरुनगर, ता. १८ : अमावस्येच्या मुहूर्तावर रेटवडी (ता. खेड) येथील स्मशानभूमीत अंधश्रद्धेतून तंत्रमंत्रासाठी अघोरी कृत्य केले आहे. ही घटना सोमवारी रात्री घडली. हे कृत्य करणाऱ्यास पोलिसांनी शोधावे आणि फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी रेटवडी ग्रामस्थांनी केली आहे.

सोमवारी (ता.१७) अमावस्या होती. अमावस्येच्या मुहूर्तावर अंधश्रद्धेपोटी काही तांत्रिक मांत्रिक अघोरी उपचार करतात. असाच एक प्रकार रेटवडी गावच्या स्मशानभूमीत सोमवारी रात्री केल्याचे उघडकीस आले आहे. त्याठिकाणी काळ्या रंगाच्या बोकडाचे मुंडके, पाय, काळ्या रंगाच्या बाहुल्या, लिंबू, सुई, हळद-कुंकू आढळून आले. जादूटोणाविरोधी कायद्यातील कलमानुसार भूत उतरविण्याच्या बहाण्याने चमत्काराचा प्रयोग गुप्तधन, करणी, भानामती या नावानं अमानुष, अनिष्ट, अघोरी कृत्य करणे, पशुबळी देणे, एखादी व्यक्ती करणी करते, जादूटोणा करते, भूत लावते, अपशकुनी आहे, सैतान आहे असं जाहीर करणं, भूत पिशाच्चाना आवाहन करून घबराट निर्माण करणे, इत्यादी गोष्टी गुन्ह्यास पात्र आहेत. या प्रकारामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी याचा शोध घ्यावा आणि हा अघोरी प्रकार करणाऱ्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी रेटवडी ग्रामस्थांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Insurance: लहान फॉर्म अन् मोठा फायदा! PF खात्यातील या फॉर्मने कुटुंबाला मिळू शकतात 7 लाख रुपये

Hasan Mushrif Kolhapur ZP Political Strategy : बहुमत असूनही पेच? पण मुश्रीफांनी करून दाखवलं 'अशक्य ते शक्य'; कसं जुळवलं सत्तेचं समीकरण? वाचा सविस्तर...

Latest Marathi News Live Update : कल्याण मध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने भव्य मिरवणूक

Thane politics: राजकीय खळबळ! ‘उबाठा’चे चार नगरसेवक शिंदे गटात; मध्यरात्री ठाण्यात पक्षप्रवेश, जिल्हाप्रमुखांच्या हाती ‘धनुष्यबाण’

Crime News : बॅनरवर फोटो खाली का? नाशिकमध्ये नामांकित कॉलेजच्या विद्यार्थ्याचे अपहरण करून रात्रभर डांबले

SCROLL FOR NEXT