पुणे

उन्नत मार्गाच्या कामाची निविदा काढा

CD

राजगुरुनगर, ता. ३ : पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नाशिक फाटा ते राजगुरुनगर या उन्नत मार्गाची प्रलंबित निविदा प्रक्रिया आचारसंहितेपूर्वी पार पाडावी, अशी मागणी राष्ट्रीय महामार्गाचे समन्वयक दिलीप मेदगे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली.
गडकरी यांच्या नुकत्याच झालेल्या पुणे दौऱ्यादरम्यान त्यांनी प्रत्यक्ष भेटून निवेदन देत ही मागणी केली‌. पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नाशिक फाटा ते राजगुरुनगर या उन्नत मार्गास रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. या कामाबरोबरच तळेगाव - चाकण- शिक्रापूर आणि वाघोली ते शिरूर या उन्नत मार्गांनाही मंजुरी दिली आहे. या तीनही कामांच्या निविदा प्रसिद्ध केल्या होत्या आणि ८ फेब्रुवारीपर्यंत त्या भरण्यासाठी मुदत दिली होती.‌ या तीनही कामांच्या निविदा जवळपास २८ हजार कोटींच्या होत्या आणि कामांचे ७ भाग करून त्या प्रसिद्ध केल्या होत्या. तथापि काही तांत्रिक अडचणीमुळे ८ फेब्रुवारीपर्यंत होऊ घातलेली निविदा प्रकिया पुढे ढकलली. त्यामुळे ही बहुप्रतिक्षित कामे पुन्हा लांबणीवर पडली आहेत.‌
यासंदर्भात मेदगे यांनी गडकरी यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन देऊन ही निविदा प्रक्रिया पूर्ण करून कार्यारंभ आदेश द्यावेत, अशी मागणी केली. आचारसंहितेपूर्वी ही निविदा प्रक्रिया पार पडली नाही, तर अनिश्चित काळासाठी हे काम पुढे ढकलेल आणि लोकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागेल, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर CJP चा उत्तर प्रदेश सरकारविरोधात मोर्चा; दिला निर्वाणीचा इशारा

मी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं... ! वैभव सूर्यवंशीने व्यक्त केल्या भावना; VVS Laxman अन् इशान किशन यांच्याबद्दल म्हणाला...

Chef Kunal's Masoor Dal Pulao: रोजच्या जेवणाचा कंटाळा आला? मग शेफ कुणाल कपूरचा मसूर डाळ पुलाव एकदा करून पाहाच!

अनेकदा मागणी करूनही डिंपल कपाडियांनी राजेश खन्नांना घटस्फोट का दिला नाही? लिव्ह इन पार्टनरने सांगितलं खरं कारण

Commonwealth Games 2026 : पदकाच्या अपेक्षा घेऊन, तो ग्लास्गोत आला अन् पहिल्याच फेरीत बाद झाला; गुरिंदरवीर सिंगच्या Exit ने भारताला धक्का...

SCROLL FOR NEXT