पुणे

चासमध्ये तरुणावर दोघांकडून चाकूहल्ला

CD

राजगुरुनगर, ता. १६ : पूर्ववैमनस्यातून दोघांनी तरुणावर चाकूहल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना खेड तालुक्यातील चास येथे बुधवारी रात्री घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी गंभीर जखमी झालेला चास येथील तरुण शुभम रत्नपारखी याचे वडील रवींद्र रत्नपारखी यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे चासमध्ये ‘मामा वडेवाले’ नावाचे हॉटेल आहे. तेथे बुधवारी रात्री साडेआठ वाजता सिद्धेश खंडू तनपुरे व आदित्य मारुती तनपुरे (दोघेही रा. तनपुरे वस्ती, आखरवाडी, ता. खेड) हे दोघे जण आले. आठ- दहा दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून त्यांनी शुभम याला, ‘तुला ल‌ई मस्ती आली का? तुला जिवंत सोडत नाही’ असे धमकावले. त्यानंतर आदित्य याने शुभम यास धरले आणि सिद्धेश याने त्याच्या हातातल्या चाकूने शुभम याच्या पोटात व छातीवर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला‌. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघा संशयित आरोपींवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ठाकरे बंधू एकटवले! ४ ऑक्टोबरला 'जनमोर्चा'ची घोषणा; नेमका मुद्दा काय?

Virat Kohli Retirement: २०२७ चा वर्ल्ड कप हा माझा भारतासाठी शेवटचा...; विराट कोहलीचे निवृत्तीचे संकेत, रोहित शर्माही म्हणाला की...

Amazon Great Indian Festival sale 2026: स्मार्टफोन्सवर ऑफरचा पाऊस; मिळणार भरघोस डिस्काउंट! पाहा कोणत्या फोनची किंमत किती?

Incognito मध्ये सर्च केल्यावर हिस्ट्री दिसत नाही; पण ‘या’ लोकांना तुमची माहिती कळू शकते

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात मनसे-ठाकरे गटाचा ४ ऑक्टोबरला संयुक्त मोर्चा

SCROLL FOR NEXT