राजगुरुनगर, ता. ५ : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापतिपदाच्या निवडणुकीला पणनमंत्र्यांनी दिलेली स्थगिती उच्च न्यायालयाने उठवली. ही निवडणूक आता १० ऑक्टोबर रोजी होणार असून, अध्यासी अधिकाऱ्यांनी सर्व संचालकांना सभेचा अजेंडा पाठविला आहे.
खेड बाजार समितीचे विद्यमान सभापती कैलास लिंभोरे व उपसभापती विठ्ठल वनघरे यांनी आपापल्या पदांचे राजीनामे दिल्याने २८ सप्टेंबर रोजी या दोन्ही पदांसाठी निवडणूक होणार असल्याचे जाहीर केले होते. दरम्यान बाजार समितीत बहुमत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूचे, म्हणजे आमदार समर्थक गटाचे तीन संचालक अनपेक्षितपणे विरोधकांना जाऊन मिळाल्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली. त्यानंतर कैलास लिंभोरे यांनी समांतरपणे उच्च न्यायालयात आणि पणनमंत्र्यांकडे अपील दाखल करून आपला राजीनामा खोटा असल्याचा दावा केला आणि निवडणुकीस स्थगिती मागितली. उच्च न्यायालयाने ती विनंती नाकारली. पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे निवडणुकीस स्थगिती दिली, म्हणून निवडणूक स्थगित झाली. पणनमंत्र्यांच्या निकालाच्या विरोधात बाजार समितीच्या दहा संचालकांनी उच्च न्यायालयात दाद मागितली. त्यावर ३ ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने पणनमंत्र्यांनी दिलेली स्थगिती उठवली आणि जिल्हा सहनिबंधकांना निवडणूक घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार आता १० तारखेला या पदांसाठी निवडणूक होणार आहे.
सध्या आमदार समर्थकांकडे आठ आणि विरोधकांकडे दहा, असे बलाबल असल्याची चर्चा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.