राजगुरूनगर, ता. १९ : खेड-आळंदी मतदारसंघात मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे. मोहोरबंद मतदान यंत्रे आणि मतदानाच्या साहित्यासह मतदान अधिकारी व कर्मचारी आज मतदानकेंद्रांवर रवाना झाले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल दौंडे यांनी दिली.
तालुक्यात एकही मतदानकेंद्र संवेदनशील नाही, सुरक्षितता म्हणून १९५ मतदान केंद्रांवरून वेब कॅमेऱ्यांद्वारे थेट प्रक्षेपण होणार आहे. राजगुरुनगर येथील महात्मा गांधी विद्यालयातील मतदान केंद्र क्रमांक १५१ येथे पिंक मतदान केंद्र, धुओली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मतदान केंद्र क्रमांक ६ येथे युनिक मतदान केंद्र, होलेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील मतदान केंद्र क्रमांक २०७ येथे दिव्यांग मतदान केंद्र उभारण्यात येणार आहे. चाकण येथील मुलींची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील मतदान केंद्र क्रमांक २८९ येथे युवा व्यवस्थापित मतदान केंद्र, वाकी खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मतदान केंद्र क्रमांक २३० येथे मॉडेल मतदान केंद्र, राजगुरुनगर येथील मुलींची जिल्हा परिषद शाळा मतदान केंद्र क्रमांक २३९ येथे पर्दानशीन मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहे.
मतदानसाठी ३८९ मतदान यंत्रे व व्हीव्हीपॅट यंत्रे वापरण्यात येणार आहेत. तसेच अतिरिक्त २५ टक्के मतदान यंत्रे क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे राखीव ठेवण्यात येणार आहेत. मतदान यंत्रांबरोबर मतदार याद्या, सीलबंद करण्याचे साहित्य, शाई इत्यादी साहित्यासह औषधेही कर्मचाऱ्यांबरोबर पाठविण्यात आली आहेत. दरम्यान, कर्मचारी व साहित्य वाहतुकीसाठी एकूण ६५ एस टी बसेस व ७ खासगी वाहने उपलब्ध केली आहेत.
मतदारसंघात ३ लाख ७६ हजार मतदान चिठ्ठ्यांचे बीएलओमार्फत वाटप करण्याचे नियोजन होते. मतदारांना पिण्याच्या पाण्याची सुविधा, मतदानासाठी लागणारे टेबल,खुर्ची इत्यादी साहित्य, वीज पुरवठा, शौचालयांची युनिट, महिलांसाठी व लहान मुलांसाठी विश्रामकक्ष, दिव्यांगासाठी रँम्प व व्हील चेअर्स इत्यादी सुविधा पूर्ण करण्यात आल्या आहेत.
एकूण मतदार केंद्र........३८९
एकूण मतदार ........स्त्री १८२८९२, पुरुष १९३७१९, तृतीयपंथी मतदार १२. एकूण ३७६६२३.
नेमणूक केलेले क्षेत्रीय अधिकारी........३६
नेमणूक केलेले मतदान अधिकारी व कर्मचारी ........१८८८.
खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षांवरील ७५ ज्येष्ठ नागरिक व ४५ दिव्यांग अशा एकूण १२० मतदारांच्या गृह मतदानासाठी १५ व १६ नोव्हेंबर रोजी गृह मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या दोन दिवसात ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग अशा ११५ मतदारांनी गृह मतदान केले. तर २३१ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी टपाली मतदान केले आहे.
- अनिल दौंडे, निवडणूक निर्णय अधिकारी.
03392
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.