पुणे

खेड हिट ॲंड रन प्रकरणात २४ तासांनतरही गुन्हा नाही

CD

राजगुरुनगर, ता. १२ : येथे मंगळवारी (ता. ११) रात्री घडलेल्या ‘हिट ॲंड रन’ प्रकरणाला २४ तास उलटून गेल्यानंतरही गुन्हा दाखल केला नाही. भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय डोळस यांनी याप्रकरणी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर खेड पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले.
राजगुरुनगर (ता. खेड) परिसरात वाडा रस्त्यावर सातकरस्थळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत एका बेधुंद मोटारचालकाने बेदरकारपणे गाडी चालवत तीन मोटरसायकलींना व पादचाऱ्यांना मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास थोड्या थोड्या अंतरावर उडवले. त्यात या मोटरसायकलींवरील तीन जण गंभीर जखमी झाले होते. त्यांचे पाय मोडले असून, ते येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. इतर जखमींवरही उपचार सुरू आहेत. मात्र, एवढे गंभीर प्रकरण असूनही खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नाही. गुन्हा दाखल करण्यासाठी कोणीही फिर्याद देण्यास तयार नाही. त्यामुळे गुन्हा दाखल नाही, असे पोलिसांनी सांगितले.
ही गोष्ट भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष विजय डोळस यांना समजल्यानंतर त्यांनी त्या खासगी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. त्यांना धीर दिला आणि याबाबत फिर्याद देणे आवश्यक असल्याचे त्यांना पटवून दिले. त्यानंतर ते खेड पोलिस ठाण्यात गेले आणि माहिती घेतली. फिर्याद दाखल नसल्याचे समजल्यावर त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला.
‘या अपघातातील जखमी गरीब मजूर आहेत. ते अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. त्यांच्यावर दबाव आहे म्हणून ते तक्रार देत नाहीत. एखाद्या प्रकरणात कोणी फिर्यादी नसेल, तर पोलिस स्वतःहून फिर्याद दाखल करू शकतात. त्यानुसार फिर्याद दाखल करावी आणि जखमी गरीब मजुरांना न्याय द्यावा,’ अशी भूमिका डोळस यांनी घेतली. त्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीपसिंह सिसोदे यांनी पोलिसांकडून माहिती घेतली आणि डोळस व भीमशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांना या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Solapur flight: पुण्याहून सोलापूर आता ४० मिनिटांत पोहोचणे शक्य होणार; १ मेपासून स्टार एअरची विमानसेवा, नवीन स्लॉट मंजूर!

आवडत्या क्रिकेटपटूविरोधात डॉ. आंबेडकरांनी लढवली होती निवडणूक, हा प्रसंग एकदा वाचाच...

Kolhapur Danoli Crime : कोल्हापुरातील दानोळीमध्ये अपहरण करून खून, २५ लाखांची मागणी, भरतेशचा कारण नसताना बळी, घटनास्थळी आमदार यड्रावकर दाखल

Bihar CM: बिहारचा नवा मुख्यमंत्री ठरला! 'या' नावावर शिक्कामोर्तब, अधिकृत घोषणा संध्याकाळी

Ayushman Bharat Scheme Update: आयुष्मान भारत योजनेत मोठा बदल! मोदी सरकारमुळे मिळणार ₹10 लाखांपर्यंत मोफत उपचार

SCROLL FOR NEXT