राजगुरुनगर, ता. २६ : खेड तालुक्यातील धर्मरायाची मांजरेवाडी येथील खून झालेल्या अत्याचारित पीडितेचा खटला जलदगती न्यायालयात चालवून संशयित आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी आयोग प्रयत्न करेन, असे आश्वासन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिले.
चाकणकर यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. पीडितेच्या कुटुंबाला मुख्यमंत्री आर्थिक सहायता निधीतून आणि मनोधैर्य योजनेतून मदत दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. या घटनेचा तपास लवकरात लवकर पूर्ण करून आरोपपत्र दाखल करावे, अशा सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेखा मोहिते पाटील, रोहिणी राक्षे, वंदना सातपुते, सरपंच अनिता मांजरे, मयूरी मांजरे, कविता आल्हाट, रूपाली पानसरे, ॲड. मनीषा टाकळकर, हेमा रिठे, कांचन मांजरे,भगवान मांजरे, जयसिंग मांजरे, गणेश मांजरे आदी उपस्थित होते.
आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशा मागणीचे निवेदन मांजरेवाडीतील महिलांनी चाकणकर यांना दिले. आरोपीचे नातेवाईक गावात दहशत निर्माण करीत आहेत. पोलिसांनी त्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल, असा इशारा महिलांनी चाकणकर यांच्या समोर पोलिसांना दिला. चाकणकर यांनी पोलिसांना तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.