पुणे

जैदवाडी येथे रस्त्याच्या वादातून दगडफेक

CD

राजगुरुनगर, ता. २९ : जैदवाडी (ता. खेड) येथे रस्त्याच्या वादातून धक्काबुक्की, दगडफेक आणि वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची घटना मंगळवारी (ता. २९) घडली.
जैदवाडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू झाले आहे. मात्र, हा रस्ता आमच्या खासगी मालकीच्या जमिनीतून जात असून, तो अधिकृत नसल्याने अन्य मार्गाने केला जावा, असे माळेगाव येथील काही आदिवासी खातेदारांचे म्हणणे आहे. मंगळवारी ठेकेदाराने रस्त्यावर कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू केले. त्यावेळी सुमारे ५० आदिवासी पुरुष व महिलांनी या रस्त्यावर काम करू नये असा पवित्रा घेतला. जैदवाडीच्या बाजूने माजी सरपंच विकास जैद, माजी सरपंच बाळासाहेब जैद, उपसरपंच कैलास जैद, सदस्य बबन गावडे, विजय जैद आदी यावेळी येथे उपस्थित होते. काम करू द्यावे, असे त्यांचे म्हणणे होते. ठेकेदाराने काम सुरू केल्यावर माळेगाव येथील आदिवासी खातेदारांनी सामग्री घेऊन आलेल्या वाहनांवर दगडफेक केली. तसेच, उपस्थित ग्रामस्थांवरही हल्ला केला. त्यात विकास जैद यांच्या हातावर दगड लागून ते जखमी झाले.
यानंतर दोन्ही बाजूचे नागरिक खेड पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले. तेथेही दोन्ही गटात बाचाबाची झाली. पोलिसांच्या वतीने संतोष घोलप, सुनील बांडे यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांना शांत केले. वादविवाद न करता कायदेशीर मार्गाने तोडगा काढण्याचा सल्ला त्यांना दिला. या शासकीय कामात अडथळा आणू नये, अशी समज त्यांना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Schedule: जेतेपदासाठी लढण्यास टॉप - ४ संघ सज्ज! कधी अन् कुठे रंगणार प्लेऑफचे सामने? नोट करून ठेवा

IPL 2026: मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थानने 'ती' चाल खेळली अन् पंजाब-कोलकाताचा गेम केला; कर्णधार रियान परागचा खुलासा

MI vs RR: वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड! मुंबई इंडियन्सविरुद्ध ४ धावांवर आऊट होऊनही घडवलाय इतिहास

IPL 2026 Final Points Table: अजिंक्य रहाणे लढला, पण KKR हरले! दिल्लीने शेवटचा सामना जिंकला अन् CSK ला टाकले मागे

Trump on Iran: अमेरिका-इराण चर्चेत मोठी घडामोड! अण्वस्त्र बनवू देणार नाही, करार होईपर्यंत निर्बंध कायम; ट्रम्प यांचा इशारा

SCROLL FOR NEXT