पुणे

आंतरजातीय प्रेमविवाहाच्या रागातून मारहाण

CD

राजगुरुनगर, ता. ४ : आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने संतप्त झालेल्या मुलीच्या कुटुंबीयांनी तिच्या पतीला मारहाण करून मुलीला जबरदस्तीने पळवून नेल्याची घटना खेड तालुक्यातील खरपुडी बुद्रुक येथे रविवारी (ता. ३) दुपारी घडली. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात मुलीचा भाऊ आणि आईसह १८ ते २० जणांवर अपहरण आणि जबर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी विश्वनाथ बबन गोसावी (वय ४३, रा. खरपुडी बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी विश्वनाथ गोसावी व त्यांचा परिवार खरपुडी येथे आश्रम चालवतात. तसेच, हार्डवेअर दुकानाचा व्यवसाय आणि शेती करतात. विश्वनाथ आणि प्राजक्ता राजाराम काशीद (लग्नापूर्वीचे नाव, वय २८, रा. खरपुडी बुद्रुक) यांच्यात प्रेमसंबंध जुळले आणि त्यातून त्यांनी ५ ऑगस्ट २०२४ रोजी वैदिक पद्धतीने लग्न केले. हा आंतरजातीय विवाह असल्याने प्राजक्ताच्या कुटुंबीयांचा त्याला विरोध होता.
रविवारी दुपारी प्राजक्ताचा भाऊ अक्षय ऊर्फ गणेश राजाराम काशीद, आई सुशीला राजाराम काशीद, चुलतभाऊ बंटी काशीद व इतर १५ ते १६ अनोळखी तरुण विश्वनाथ यांच्या घरी गेले. तेथे पहिल्या मजल्यावर घरकाम करत असलेल्या प्राजक्ताला त्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि केसाला धरुन ओढत जबरदस्तीने त्यांच्याबरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. प्राजक्ताची आरडाओरड ऐकून तेथे आलेल्या विश्वनाथने तिला सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याला मुलीच्या भावाने व बरोबर आलेल्या इतरांनी दांडक्याने व फायटरने मारहाण केली. पायावर मारहाण करण्यात आल्याने विश्वनाथ याचा पाय मोडला. त्याला सोडविण्यास आलेल्या तिघांनाही त्यांनी मारहाण केली आणि दहशत निर्माण करून मुलीला जबरदस्तीने घेऊन गेले.
जखमी विश्वनाथने खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर त्याला पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल केले. रात्री उशिरा खेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India responds strongly to Trump: ट्रम्प यांचे आरोप अन् टॅरिफ वाढवण्याच्या धमकीला आता भारताचंही सडेतोड प्रत्युत्तर, म्हटले...

Video Viral : गुजरातमध्ये हत्तीवर अन्याय! व्हिडीओ व्हायरल; 'महादेवी'प्रमाणे पेटा लक्ष घालणार का?

Local Block: मोठी बातमी! ५ ते ८ ऑगस्टपर्यंत लोकलचा विशेष ब्लॉक, सेवा पूर्णपणे बंद राहणार, जाणून घ्या वेळापत्रक

Truck Accident : गोंडपिपरीत विचित्र अपघात! ट्रॅकने एक किलोमीटर नेले फरफटत; एकाचा मृत्यू, तीन गंभीर

Trump accuses India :''रशियाकडून तेल खरेदी करून भारत कमावतोय नफा'' ट्रम्प यांचा आरोप; अन् टॅरिफ वाढवण्याचीही धमकी!

SCROLL FOR NEXT