पुणे

एकाच दिवसात १२ पाणंद रस्ते खुले

CD

राजगुरुनगर, ता. ६ : महसूल सप्ताहानिमित्ताने, खेड तालुक्याने शीव-पाणंद रस्ते खुले करण्याचा आणि दुतर्फा वृक्षारोपण करण्याचा उपक्रम राबवला. या मोहिमेमध्ये एकाच दिवसात १२ शीव-पाणंद रस्ते खुले करण्यात आले. यामुळे २०४२ शेतकऱ्यांना या रस्त्याचा फायदा मिळणार आहे.

रस्ते खुले करण्याच्या मोहिमेसाठी मंडलाधिकारी आणि ग्रामसेवकांनी आठवडाभर गावागावात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि सर्वांच्या सहमतीने रस्ते खुले करण्याचे नियोजन केले. या मोहिमेमुळे सुमारे साडेआठ किलोमीटर लांबीचे रस्ते खुले झाले. या रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले. या मोहिमेमुळे शेतातील पिके मुख्य रस्त्यापर्यंत आणणे सोपे होणार आहे. तसेच, शेतीची अवजारे आणि इतर साहित्य शेतापर्यंत पोहोचवणेही आता सुलभ होणार आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या प्रेरणेतून, तसेच उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान यशस्वी झाले. तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील, महसूल नायब तहसीलदार राम बिजे, निवासी नायब तहसीलदार चेतन मोरे, सर्व मंडल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्राम महसूल सेवक आणि खेड तालुक्यातील जनतेच्या सहभागातून ही मोहीम पार पडली.

03881

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar : ''...त्यावेळी आज आपणच पेरलेल्या विषाची जाणीव त्यांना होईल, पण वेळ मात्र गेलेली असेल''

ENG vs IND: टीम इंडियाने बुमराहशिवाय दोन्ही कसोटी जिंकल्या! सचिन तेंडुलकर म्हणाला, 'त्याने सुरुवात चांगली...'

Trump Tariff India Response: ट्रम्प यांच्या अतिरिक्त टॅरिफवर आता भारतानेही स्पष्ट केली भूमिका अन् दिलं सडेतोड प्रत्युत्तर!

Tutari Express: तुतारी एक्स्प्रेसमुळे प्रवाशांचा खोळंबा, वेळापत्रकात बदल करण्याची मागणी

Virar News : अर्नाळा किनाऱ्यावरील जीवरक्षकांनी वाचवले आठ जणांचे प्राण; माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी केला जीवरक्षकांचा सत्कार

SCROLL FOR NEXT