पुणे

राजगुरुनगरला प्रचारासाठी ‘एआय’चा वापर

CD

राजगुरुनगर, ता. २९ : राजगुरुनगरला एआय तंत्रज्ञानाचा उपयोग करून प्रचारासाठी तयार केलेली चित्रफीत वापरली आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशाप्रकारे एआय तंत्रज्ञानाचा वापर करून राजकीय चित्रफीत बनली असल्याचे निर्माते श्रीराज चव्हाण व शुभम आडागळे यांनी सांगितले. याशिवाय रील्स, पॉडकास्ट, ॲनिमेशन क्लिप्स, एआय आधारित प्रचारगीते, ग्राफिक्स, मोशन ग्राफिक्स आदी नवनवीन तंत्रज्ञान आणि पद्धतींचा प्रचारात वापर होताना दिसत आहे.‌

तंत्रज्ञानाच्या वेगाने वाढणाऱ्या युगात स्थानिक तरुणही मागे नाहीत, याची प्रचिती राजगुरुनगरातील दोन तरुणांनी दाखवून दिली आहे. श्रीराज चव्हाण आणि शुभम आडवळे या दोघांनी मिळून एआय तंत्रज्ञानाचा वापर करून एका उमेदवारासाठी, एक आकर्षक आणि प्रभावी राजकीय प्रचारफीत तयार केली आहे. ही चित्रफीत त्यांच्या स्वतःच्या ‘ऑड क्रिएटिव्हज् अँड मॅनेजमेंट’ या कंपनीमार्फत बनविण्यात आली असून, संवाद आणि संदेश अधिक परिणामकारकरीत्या जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. या चित्रफितीत एआयच्या मदतीने दृश्य, आवाज, टोन आणि सिनेमॅटिक इफेक्ट्स यांचा उत्तम समन्वय साधला असून, कमी वेळेत आणि उच्च दर्जाची निर्मिती करून दाखविली आहे.
एआयचा वापर करून कमी खर्चात अनेक नगरसेवक पदांच्या उमेदवारांनी गाणी बनविली आहेत. ती गल्लोगल्ली वाजत आहेत. सोशल मीडियावरील प्रचारावर जास्त भर आहे. नगराध्यक्ष पदांच्या उमेदवारांनी ‘पॉडकास्ट’ केले हेही यावेळचे वैशिष्ट्य आहे. पारंपरिक हॅंडबिल, फ्लेक्स यांचा वापर आहे. मतदारांना आमिष म्हणून साड्या, स्वेटर, पाकिटे वाटली जात आहेत. तर घरोघर प्रचार आणि पायी प्रचारफेऱ्यांवर अनेकांचा भर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : राज्यात थंडीचा कडाका कमी, पावसाची होणार एन्ट्री, आज तुमच्या भागात कसे असेल हवामान ? जाणून घ्या

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 27 जानेवारी 2026

Yogi Government : योगी सरकारचा मोठा प्लॅन; उत्तर प्रदेशात ग्रामीण अर्थव्यवस्थेची धुरा आता महिलांच्या हाती

आजचे राशिभविष्य - 27 जानेवारी 2026

Panchang 27 January 2026: आजच्या दिवशी ऋणमोचक मंगळ स्तोत्राचे पठण व ‘अं अंगारकाय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT