पुणे

फोटो ग्रुपवर टाकल्याने लोखंडी रॉडने मारहाण

CD

राजगुरुनगर, ता. २३ : कंपनीत कामावर असताना मोबाईल वापरत असल्याचा फोटो ग्रुपवर टाकल्याच्या रागातून कामगाराने फोटो टाकणाऱ्याला लोखंडी रॉडने जबर मारहाण केल्याची घटना राक्षेवाडी (ता. खेड) येथील वाफगाव रस्त्यावर रविवारी (ता. २२) संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घडली. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गंभीर मारहाणीचा आणि धमकी दिल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल हिरामण तोत्रे (सध्या रा. राक्षेवाडी, मूळ रा. वडगाव पाटोळे, ता. खेड) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार तोत्रे या हल्ल्यात जखमी झाले असून, अक्षय भगवान भांबुरे (रा. ढोरे भांबुरवाडी, ता. खेड) याने त्यांच्यावर हा हल्ला केला. भांबुरे हा कंपनीत मोबाईल फोन वापरत असल्याचा फोटो तोत्रे यांनी कंपनीच्या मनुष्यबळ व्यवस्थापकास पाठविला आणि कंपनीच्या व्हॉट्स‌ॲप ग्रुपवर प्रसिद्ध केला. याच्या रागातून भांबुरे याने वाफगाव रस्त्यावरील एका औषधाच्या दुकानासमोर तोत्रे असताना लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यावर दोन फटके मारले आणि डाव्या हाताच्या कोपरावर फटका मारला. तसेच, ‘यापुढे तक्रार केलीस तर जीवे मारून टाकीन’ अशी धमकी दिली. शिवीगाळ केली आणि दमदाटी केली. भांबुरे याच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरारी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress spokesperson assaulted Video : काँग्रेस प्रवक्त्यास पुण्यात मारहाण!, प्रदेशाध्यक्ष सपकाळांनी ट्वीट केला घटनेचा व्हिडिओ

टी-२० विश्वचषक सामन्यावर सट्टेबाजी! स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने केली कठोर कारवाई

T20 WC, WI vs ZIM: ७ चौकार, ७ षटकार... वानखेडेवर हेटमायरचं वादळ; झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना झोडपत विंडीजसाठी रचला वर्ल्ड रेकॉर्ड

Latest Marathi News Live Update : गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाचा भाजीपाला, फळबागांना फटका

Virar News : मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे संदर्भात जपान आंतरराष्ट्रीय संस्था JICA यांची वसई-विरार शहर महानगरपालिकेला भेट

SCROLL FOR NEXT