पुणे

राक्षेवाडीतील तरुणाचा खून झाल्याचे निष्पन्न

CD

राजगुरुनगर, ता. २१ : खेड तालुक्यातील राक्षेवाडी येथील रहिवासी असलेला तरुण बेपत्ता झाला होता. मात्र त्याचा मृतदेह जैदवाडी (ता. खेड) हद्दीत सापडला आणि त्याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. धनंजय मारुती घेवडे (वय ३३, रा. राक्षेवाडी ता. खेड, मूळ रा. कारेगाव, ता. आंबेगाव), असे मृताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताचा भाऊ सचिन घेवडे याने यासंदर्भात फिर्याद दिली आहे. मृत धनंजय याच्याशी १६ मार्च रोजी रात्री ८ वाजल्यापासून संपर्क होत नव्हता. त्याचा फोनही लागत नव्हता. कुटुंबीयांनी दोन दिवस नातेवाइकांकडे आणि आजूबाजूला त्याचा शोध घेतला, परंतु तो सापडला नाही. म्हणून तो बेपत्ता झाल्याची खेड पोलिस ठाण्यात त्याच्या पत्नीने तक्रार दिली. दरम्यान १८ मार्च रोजी जैदवाडी गावाच्या हद्दीतील एका जमिनीवर त्याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्यात व तोंडावर कोणत्यातरी वस्तूने गंभीर मारहाण करून त्याचा खून कला होता. भावाच्या फिर्यादीवरून खेड पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLAs Suspends: पक्षाविरोधी भूमिका नडली! BJD कडून सहा आमदारांचे तात्काळ निलंबन; टोकाचा निर्णय घेण्याचं नेमकं कारण काय?

Ashok Kharat Files: ''योनी पूजनाचे धक्कादायक व्हिडीओ...'', नेत्याचा खळबळजनक दावा, कॅप्टन खरात नेमकं करायचा तरी काय?

Gas Cylinder Shortage : जनता 'गॅस' वर स्वयंपाक चुलीवर...; ग्रामीण भागासह शहरातील हाॅटेल व्यावसायिकांना फटका...

तरडे–शिंदवणे रस्त्यावर स्ट्रीट लाईटची मागणी; अपघात टाळण्यासाठी नागरिकांची पुढाकार

Pachod Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार; एक जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT