राजगुरुनगर, ता. ११ : खेड तालुक्यातील जैदवाडी येथील धनंजय घेवडे खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपीला त्याच्या साथीदारांसह पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा आणि खेड पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे आरोपीने केलेले आणखी दोन खून उघडकीस आले असून, त्याच्याकडून दोन पिस्तूल व काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
राक्षेवाडी येथील धनंजय मारुती घेवडे ( वय ३३, रा. राक्षेवाडी ता. खेड, मूळ रा. कारेगाव ता. आंबेगाव) हा तरुण बेपत्ता झाल्यानंतर १८ मार्चला जैदवाडी हद्दीत त्याचा मृतदेह सापडला होता. डोक्यावर अज्ञात हत्याराने वार करून त्याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी ११० ''सीसीटीव्ही'' कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासले. त्यावरून सराईत गुन्हेगार ललित दीपक खोल्लम (रा. शिरोली, ता. खेड) आणि नंदलाल दिलीप होले (रा. कारेगाव, ता. आंबेगाव) यांच्यावर संशय बळावला. पोलिसांनी बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर परिसरात सापळा रचून दोघांना उसाच्या शेतातून पाठलाग करून पकडले. चौकशीत आरोपींनी लोखंडी रॉड व दगडाने मारहाण करून घेवडे यांचा खून केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यात आर्थिक मदत करणाऱ्या नीलेश कैलास सणस (रा. कारेगाव) यालाही पोलिसांनी अटक केली आहे.
खोल्लम ''मकोका''मधील आरोपी
मुख्य आरोपी खोल्लम याच्यावर यापूर्वी ३५ गुन्हे दाखल असून तो ''मकोका''मधील आरोपी आहे. त्याने ठाणे येथील श्रीकांत वाडेकर या तरुणाचे अपहरण करून खून केल्याचे आणि त्याची आई रूपाली वाडेकर हिचाही शिरोली येथे खून केल्याची कबुली दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.