पुणे

राजगुरुनगर बॅंकेला २६ कोटींचा नफा

CD

राजगुरुनगर, ता. १७ : राजगुरुनगर सहकारी बँकेने सरत्या आर्थिक वर्षात २६ कोटी ७४ लाखांचा उच्चांकी निव्वळ नफा मिळवला. आपला ढोबळ एनपीए ४.६३ टक्क्यांपर्यंत खाली आणला, तर निव्वळ एनपीए ० टक्के राखण्यात यश मिळवले आहे. चाकण- शिक्रापूर रोड, कुरुळी आणि तळेगाव दाभाडे येथे बँकेच्या नवीन शाखा सुरू करण्याचा बँकेचा मानस आहे, अशी माहिती अध्यक्ष सागर पाटोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष रामदास धनवटे, संचालक किरण आहेर, राजेंद्र सांडभोर, गणेश थिगळे, विजया शिंदे, राजेंद्र वाळुंज, दिनेश ओसवाल, विनायक घुमटकर, अविनाश कहाणे, समीर आहेर, सचिन मांजरे, विजय डोळस, महेश शेवकरी, मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम वाकचौरे, सरव्यवस्थापक अमृत टाकळकर, सहसरव्यवस्थापक संजय ससाणे आदी उपस्थित होते.
राजगुरुनगर बँकेने आतापर्यंत ११८२ कोटींचे कर्जवाटप केलेले आहे, तर २०५६ कोटींच्या ठेवी गोळा केल्या आहेत. त्यामुळे बँकेचा एकूण व्यवसाय ३२३८ कोटींचा झाला आहे. सरत्या आर्थिक वर्षात बँकेने एकूण ९५ कोटींचे कर्ज वाटप केले, तर २४३ कोटींच्या ठेवी जमा केल्या. एकूण व्यवसाय ३३८ कोटींचा झाला. बँकेला उच्चांकी ५२ कोटी ६९ लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला असून, तरतुदींनंतर निव्वळ नफा २६ कोटी ७४ लाखांचा उरला आहे. बँकेचा  ढोबळ  एनपीए ४.६३ टक्क्यांवर आला आहे. तसेच, तरतुदींनंतर निव्वळ एनपीए ० टक्के झाला आहे. पूर्वीच्या ४ लाखांऐवजी या आर्थिक वर्षापासून सभासदांचा ५ लाखांचा अपघाती विमा बँक घेणार आहे. यावर्षी बँकेने आकुर्डी शाखेचे स्थलांतर मोशी येथे करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आळेफाटा शाखाही स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतरित करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoffs Scenario: कोलकाताचे आव्हान संपुष्टात? गुजरात टायटन्सकडून दारूण पराभव, Point Table मध्ये मोठा बदल

GT vs KKR Live: शुभमन गिलची वादळी खेळी! विराट कोहलीकडून हिसकावली ऑरेंज कॅप; वैभव सूर्यवंशी टॉप फाईव्हमधून बाहेर गेला

AOR कोण आहेत, ज्यांना AI च्या वापराबाबत सरन्यायाधीशांकडून मिळाला इशारा; म्हणाले, विश्वास महत्त्वाचा!

Pune Police Bharti News: पोलिस भरती वैद्यकीय तपासणीत डमी उमेदवाराचा पर्दाफाश; ससून रुग्णालयातील प्रकारावर तिघींवर गुन्हा

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

SCROLL FOR NEXT