पुणे

चावड्यांची जागा घेतली दुकानांनी!

CD

राजेगाव, ता. २९ ः कोणी कोणाची उमेदवारी कापली, कोणत्या गावात कोणाला चालवायचे आणि कोणाला सोडायचे, पक्षांतर्गत विरोधकांनी आपल्याला भविष्यात कोणीही पर्याय नको, म्हणूनच पडद्याआड हालचाली करून इच्छुकांना कशाप्रकारे कात्रजचा घाट दाखवला, अशा अनेक प्रश्नांची सध्या गावागावातील तथाकथित राजकीय पंडितांच्या चावडीवर चर्चांना ऊत आला आहे.
पूर्वीच्या काळी असणाऱ्या चावडीची किंवा पाराची जागा आता दुकानांनी घेतली आहे. प्रत्येक गावातील हॉटेल, पानाची टपरी, ट्रेलरचे दुकान, सलूनचे दुकान, लॉंड्री आणि मंदिरांच्या परिसरांनी पूर्वीच्या पाराची जागा घेतली आहे. सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहे. आमच्यामुळेच अमक्या अमक्याची उमेदवारी बसली नाही किंवा आमच्या समर्थनामुळेच त्यांना उमेदवारी मिळाली, नाहीतर काय बिशाद आहे त्यांची! असे कल्पनेचे पतंग उडविण्यात सध्या पारावरची अर्थात राजकीय विश्लेषक मंडळी मग्न आहेत. दरम्यान, भाजप आणि राष्ट्रवादी यांची झालेली युती, ही ज्या उमेदवारांनी बऱ्याच दिवसांपासून निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. त्यांना फारशी रूचलेली दिसत नाही. त्यामुळे त्या उमेदवारांचे समर्थक काय करणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले असून, याची चर्चाही पारावर होताना दिसत आहे.

अनेकांचे गुडघ्याला बाशिंग...
यंदा लोकसभा निवडणुकीमध्ये लढण्यासाठी अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते. परंतु उमेदवारी तर एकालाच मिळाल्याने अनेक इच्छुकांनी बंडाचे निशाण उपसले आहे. अर्ज माघार घेण्याच्या दिवसांपर्यंत बंडोबांना गोंजारण्याचे काम प्रमुख पदाधिकाऱ्यांना करावे लागणार आहे. बंडोबा थंड होणार की, अपक्ष लढणार किंवा कोणाला कोणत्या पदाचे आमिष दिले आहे, अशाप्रकारे भविष्यातील अनेक पदांचे वाटप आपापले समर्थक करताना पारावर दिसत आहे.

बारामतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष...
बारामती लोकसभा मतदारसंघात होत असलेली नणंद-भावजय यांची लढाई हा विषय पारावर मोठ्या उत्सुकतेने चर्चिला जात आहे. दोन्ही उमेदवार खरेच ईर्षेने लढणार की, कोणीही आला तरी आपल्याच घरात म्हणून लुटूपुटूची लढाई होणार, याविषयी पारावर मोठ्या गंमतीने बोलले जात आहे. त्यामुळे बारामतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: दसऱ्यापूर्वी सोन्याचे भाव कोसळले! एकाच दिवसात तब्बल 25 हजारांनी घसरण; आजचा 10 ग्रॅमचा भाव पाहा

Solapur Edible Oil: खाद्यतेलाच्या दरात मोठी घट; सोलापूर बाजारात सूर्यफूल, सोयाबीन, पाम तेल प्रतिकिलो ५ रुपयांनी स्वस्त

Latest Marathi News Live Update : सोलापुरात चारा वाहतुकीवर निर्बंध! जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

IND vs AFG Asian Games: एकही चेंडू न खेळता भारत उपांत्य फेरीत; अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात नेमकं काय घडलं? नियम काय सांगतो?

छटपूजेनिमित्त परराज्यांसाठी ४१८ विशेष गाड्या, लोकल प्रवासी वाऱ्यावर; मध्य रेल्वेच्या दुटप्पीपणाविरोधात प्रवासी आक्रमक

SCROLL FOR NEXT