पुणे

दौंडमध्ये वळवाच्या पावसामुळे पिकांना संजीवनी

CD

राजेगाव, ता. १४ : दौंड तालुक्याच्या पूर्व भागात दोन दिवसांपासून पडणाऱ्या वळवाच्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. लेकरासारखे सांभाळलेले हिरवेगार पिकं डोळ्यादेखत जळताना पहावी लागणार आहेत. अशातच या पावसाने थोडासा का होईना शिडकावा झाल्याने एक प्रकारे पिकांना संजीवनीच मिळाली आहे.

भीमा नदीपात्रात पाणी संपल्याने आठवड्यापूर्वीच सर्व शेतकऱ्यांनी आपले कृषी पंप गुंडाळून घरी आणलेले आहेत. स्वतःच्या दौंड तालुक्यात अनेक ठिकाणी शनिवारी मध्यरात्री वळीव पावसाने दमदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांना सुखद धक्का दिला. मात्र वखारी मध्ये कांदा भरणाऱ्या शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. तसेच वीट भट्टीवरील कामगारांची मोठी धावपळ झाली.
गेल्या काही दिवसापासून वातावरणात उष्म्याचे प्रमाण अधिक जाणवत होते. उष्माने नागरिकांच्या अंगाची लाही- लाही होऊन जीव कासावीस
होत होता. तर अति उष्म्यामुळे नागरिक हैराण झाले होते. त्यामुळे एखादा वळीव पाऊस पडावा अशी अपेक्षा सर्वच नागरिकांची होती. शनिवारी अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना सुखद धक्का मिळाला.
राजेगाव, वाटलूज, नायगाव, खानवटे, मलठण परिसरात अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांना दिलासा मिळाला. पाऊस होणे गरजेचेच असल्यामुळे पहिल्यांदा पडलेल्या वळीव पावसाचा आनंद सर्वांनी घेतला. बालचमुने रस्त्यावर येऊन पावसात भिजत-नाचत पावसाचे स्वागत केले.

उकाड्यात पावसामुळे सुखद धक्का
गेल्या काही दिवसापासून वातावरणात उष्म्याचे प्रमाण अधिक जाणवत होते. उष्माने नागरिकांच्या अंगाची लाही-लाही होऊन जीव कासावीस होत होता. तर, अति उष्म्यामुळे नागरिक हैराण झाले होते. त्यामुळे एखादा वळीव पाऊस पडावा अशी अपेक्षा नागरिकांची होती. शनिवारी अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना सुखद धक्का मिळाला.

भीमा नदीपात्रात पाणी संपल्याने सर्व शेतकऱ्यांनी आपले कृषी पंप गुंडाळून घरी आणलेले आहेत. त्यामुळे पिके सुकून चालली होती. अशातच या पावसाने थोडासा का होईना शिडकावा झाल्याने एक प्रकारे पिकांना नवसंजीवनीच मिळाली आहे.
- सोपान चोपडे, शेतकरी, राजेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flight Incident: 180 प्रवाशांचा जीव... '9/11' सारख्या हल्ल्याचा धोका; फ्लायदुबईच्या भारतीय कॅप्टनमुळे टळला मोठा अपघात, नेमकं काय घडलं?

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात ठाण्यात तणाव; आदित्य ठाकरे, संजय राऊत कापूरबावडी पोलिस ठाण्यात

Pune Solapur Highway Accident: पुणे-सोलापूर महामार्गावर भरधाव टँकरचा थरार; दुचाकीला धडक देऊन चालक फरार, २१ वर्षीय तरुण ठार

Latest Marathi News Live Update : शेखर गोरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने विक्रमांचा पाऊस पाडला, पण आपला कुलदीप यादव कमी नाही पडला; नोंदवला जबरदस्त पराक्रम...

SCROLL FOR NEXT