पुणे

विद्यार्थ्यांच्या शोधामध्ये शिक्षकांची तारेवरची कसरत

CD

राजेगाव, ता. ८ : उन्हाळ्याच्या मोठ्या सुट्टीनंतर १५ जून रोजी सर्वत्र शाळा सुरू होत असताना जिल्हा परिषदेच्या शाळा आणि खासगी शाळा यांच्यात विद्यार्थी मिळवण्यासाठी शोधाशोध सुरू असून विद्यार्थी जमा करण्यासाठी काही शाळेतील शिक्षकांची दारोदारी भटकंती चालू असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.

जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांना विद्यार्थीसंख्या वाढविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. खासगी शाळेतील शिक्षकांना तर प्रत्येकी ठराविक विद्यार्थीसंख्येची जबाबदारी देण्यात आली असून, काहीही प्रयत्न करून तेवढे विद्यार्थी दाखल करायचेच अशी जबाबदारी सोपविली आहे. अशा परिस्थितीत खासगी संस्था व इंग्रजी माध्यमांच्या शाळा या दोन्ही संस्थांची जि. प. शाळेच्या शिक्षकांना स्पर्धा करीत विद्यार्थी मिळवावे लागत आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या टिकवण्यासाठी शाळांकडून वेगवेगळे फंडे वापरण्यात येत आहे.

अलीकडे पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सर्वच तालुक्यांत अनेकविध शालेय उपक्रम यशस्वी होताना दिसत आहे. यामुळे विद्यार्थी हसतखेळत कृतीयुक्त अध्ययन करत असल्याने विद्यार्थी शिक्षण घेण्यात रमत असल्याचे चित्र दिसत आहे.

विश्वास संपादनाचे मोठे आव्हान
गेल्या दीड ते दोन वर्षांत जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये पटसंख्यांमध्ये वाढ होत असली तरी गेल्या काही वर्षांत जिल्हा परिषदेच्या काही शाळांची प्रतिमा खालावली होती. विद्यार्थीसंख्या वाढविण्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना पालकांचा विश्वास संपादन करण्याचे मोठे आव्हान आहे. पालकांचा विश्वास संपादन केला तरच या शाळांमध्ये पुन्हा पूर्वीप्रमाणे विद्यार्थ्यांचा किलबिलाट होईल आणि जिल्हा परिषदेच्या शाळा खासगी शाळांबरोबर स्पर्धा करू शकतील, असे मत उपक्रमशील शिक्षक व्यक्त करत आहेत. खासगी शाळांमध्ये असणाऱ्या बस सुविधा, आकर्षक गणवेश, बैठक व्यवस्था या गोष्टी जिल्हा परिषदेच्या शाळेत नसल्याने विद्यार्थी खासगी शाळेकडे आकर्षित होत आहेत.

गोरगरिबांची मुले झेडपीतच
ज्या कुटुंबाची आर्थिक कुवत आहे, त्या कुटुंबातील मुले इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये पाठविली जात आहेत. मात्र, गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी कामगारांच्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेशिवाय पर्याय नसल्याने त्यांचे प्रवेश जिल्हा परिषद शाळेत होताना दिसत आहेत. पालकांमध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळांची क्रेझ असल्याने आपल्या पाल्यांना शहराकडे घेऊन जाण्याचाही प्रयत्न काही पालक करीत आहेत. या प्रक्रियेत विद्यार्थी मिळविण्यासाठी झेडपी शाळांची दमछाक होत आहे.

विद्यार्थ्यांच्या शोधामध्ये गुरुजींची भटकंती
सध्या सर्वत्र शाळा प्रवेशाची लगबग सुरू आहे. जिल्हा परिषद शाळेच्या गुरुजींची विद्यार्थ्यांच्या शोधामध्ये भटकंती सुरू असल्याचे चित्र सर्वच तालुक्यांमध्ये पाहावयास मिळते.

जिल्हा परिषद शाळेत गणवेश, शूज, सॉक्स पाठ्यपुस्तके आदी मोफत मिळतात. शालेय पोषण आहारही मिळतो. शाळांमध्ये अनेक सहशालेय उपक्रम राबवून गुणवत्ता वाढीसाठी शिक्षक प्रयत्न करतात. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांकडे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा कल दिसून येतो.
- गणेश मोरे, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, राजेगाव (ता. दौंड)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Municipal Property: पुणे महापालिकेच्या ताब्यातील चार हजार मिळकती बेवारस; प्रॉपर्टी कार्डवर नोंदच नाही, मालमत्ता विभागाचे दुर्लक्ष!

IPL 2026 PKBS vs GT : गुजरातविरुद्ध सामन्यात पंजाब किंग्जला विजय मिळून देणारा कूपर कोनोली नेमका कोण? रिंकी पाँटिंगशी आहे खास कनेक्शन...

Mumbai News: प्रामाणिक कामगिरीतूनच यश; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ‘यिन’ अधिवेशनात युवकांना मार्गदर्शन

Gold Rate Today: सोनं सलग 6 व्या दिवशी महाग! 1.5 लाखांचा टप्पा पुन्हा ओलांडला; मुंबईत आजचा ताजा भाव किती?

April Fools Day 2026: एप्रिलच्या पहिल्या दिवशीच का साजरी केला जातो 'एप्रिल फूल्स डे'? जाणून घ्या महत्त्व अन् इतिहास

SCROLL FOR NEXT