पुणे

‘राजेगावतील रोहित्रे एकाच सबस्टेशनला जोडा’

CD

राजेगाव, ता. ३० ः राजेगाव (ता. दौंड) येथील गावठाणातील सर्व रोहित्र एकाच सबस्टेशनवरून म्हणजे मलठण ११ केव्ही या सबस्टेशनवरून जोडण्याची मागणी राजेगाव ग्रामपंचायतीने केली आहे. याबाबत महावितरण दौंडचे उपअभियंता यांच्याकडे निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायत राजेगाव येथील खंडोबा ज्योतिबा मंदिरा शेजारील २२ केव्ही रोहित्र असून तो भिगवण सबस्टेशनला जोडलेला आहे. तरीही या ठिकाणी विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे तेथील लोकांना पिण्याच्या पाण्याची लाईट नसल्याने गैरसोय होत आहे. तसेच भिगवण सबस्टेशनवरून येणारी लाईनचे अंतर जास्त आहे. त्यामुळे होल्टेज कमी येत आहे. तसेच गावातील बाकी सात रोहित्र मलठण सबस्टेशन ११ केव्हीला जोडलेले आहेत. तरी राहिलेले दोन्ही रोहित्रे मलठण सबस्टेशन ११ केव्ही त्वरित जोडण्यात यावे.
राजेगाव गावठाणाला वीज पुरवठा करणारे नऊ पैकी सात रोहित्रे मलठण ११ केव्ही सबस्टेशनला जोडलेले असून उरलेले फक्त दोन रोहित्रे हे भिगवण २२ केव्ही या सबस्टेशनला जोडले आहेत. या दोन रोहित्रांमधून ग्रामदैवत राजेश्वर मंदिर, प्राथमिक शाळा, मोबाईल टॉवर्स इत्यादी महत्त्वाच्या ठिकाणांना वीजपुरवठा केला जातो.

भिगवण सबस्टेशनवरून होणारा वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. त्यामुळे एका वेळी निम्मेगाव उजेडात तर निम्मेगाव अंधारात, अशा परिस्थिती निर्माण होते. तसेच वीज नसल्याने तेथील लोकांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत आहे. त्यामुळे राहिलेली दोन रोहित्रही मलठण सबस्टेशनला जोडण्यात यावीत.
- राजेश राऊत, माजी सरपंच, राजेगाव (ता. दौंड)

ग्रामपंचायतीने केलेल्या मागणीचा विचार करून सर्वेक्षण करण्यात येईल. तसेच राजेगाव गावठाणातील राहिलेले दोन रोहित्रेही मलठण सबस्टेशन ११ केव्हीला जोडण्यासाठी लवकरच कार्यवाही करण्यात येईल.
- अमित धोत्रे, कनिष्ठ अभियंता, महावितरण, दौंड ग्रामीण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

Kannad Teacher Credit Society: आमसभेत आर्थिक अनियमिततेचे आरोप; चर्चा सुरू असतानाच राष्ट्रगीताने सभा गुंडाळल्याचा दावा

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

Marathi News Live Updates : भारत आणि जपानच्या हवाई दल प्रमुखांचे 'तेजस'मधून उड्डाण

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT