राजेगाव, ता. २२ : ‘‘शेतमाल बाजारभावाच्या सतत होत असलेल्या चढ उतारामुळे प्रक्रिया उद्योग उभारावा व शेतकऱ्यांनी गटाच्या माध्यमातून स्वतःचा ब्रँड विकसित करावा,’’ असे आवाहन आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रूपनवर यांनी केले.
राजेगाव (ता. दौंड) येथे बँक ऑफ महाराष्ट्र भिगवण, महाराष्ट्र ग्रामीण विकास केंद्र भिगवण, कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापक यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपनी याबाबत शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. त्यावेळी रूपनवर बोलत होते.
शेतकरी आता आधुनिक पद्धतीने शेती करत आहे. चांगला माल तयार करत आहे. उत्पादन भरपूर घेत आहे पण विक्री व्यवस्था मध्ये तो कमी पडतो. यासाठी सर्व शेतकरी एकत्र येऊन शेतकरी उत्पादक कंपनी एफपीओ (शेतकरी उत्पादक संघटना) स्थापन केला पाहिजे, असे मत आनंद पटवारी यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र बँकेचे कृषी अधिकारी उमेश निकम यांनी महाराष्ट्र ग्रामीण विकास केंद्र मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांविषयी माहिती सांगितली. देवा फलफले यांनी माती परीक्षण सेंद्रिय शेती, शाश्वत शेती, विक्री नियोजन याबाबत मार्गदर्शन केले.
कृषी विभागाचा आत्मा अंतर्गत राजेगाव येथे गेल्या दोन वर्षापूर्वी श्री गणेश शेतकरी गटाची स्थापना करण्यात आली असून गटात एकूण शंभर सभासद आहेत. प्रति महिना पन्नास हजार रुपये बचत जमा केली जाते. आतापर्यंत १३ लाख ६७ हजार रुपये बचत करण्यात आली आहे. त्यातून सभासदांना ११ लाख १० हजार रुपये कर्ज वाटप करण्यात आले आहे.
दरम्यान, यावेळी शेतकऱ्यांना २० किलो साखर, पाच लिटर तेल व सभासदांच्या पत्नींसाठी साडी वाटप करण्यात आली.
यावेळी राजेगावच्या कृषी सहाय्यक तेजश्री ढवळे, नवनीत जाधव, विलास चोपडे, अनिल खैरे, सागर जाधव, अशोक कदम, शहाजी गुणवरे आदी शेतकरी सभासद उपस्थित होते.
आभार राजेश राऊत यांनी मानले. कार्यक्रम नियोजन श्री गणेश शेतकरी बचत गटाचे अध्यक्ष सोपान चोपडे व सचिव गणेश जाधव यांनी केले.
00516
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.