पुणे

प्रत्येक केंद्रातून एक आदर्श शाळा निवडणार

CD

राजेगाव, ता. १८ : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधून प्रत्येकी एक आदर्श शाळा निवडण्यात येणार आहे. सर्व गटशिक्षणाधिकारी यांनी आपल्या आधिपत्याखाली असलेल्या सर्व केंद्रामधून सर्वात जास्त पटसंख्या असणाऱ्या, सर्वात जास्त शिक्षक असणाऱ्या तसेच खेळाच्या मैदानासाठी जागा उपलब्ध असलेल्या प्रत्येकी तीन शाळांची निवड करायची आहे.
या तीन शाळांची माहिती त्या भागातील आमदार महोदयांना दाखवून त्यामधून प्रत्येक केंद्रातून क्रमांक एक शाळेची आदर्श शाळा म्हणून विकास करण्यासाठी निवड करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती, पुणे जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत दिलेल्या सूचनेनुसार कार्यवाही करण्याचे आदेश एका परिपत्रकाद्वारे प्राथमिकचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी माहिती दिली.

प्रत्येक केंद्रातून क्रमांक एक च्या शाळेची निवड केल्यानंतर त्या शाळेला आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यासाठी सर्व आवश्यक बाबींची तत्काळ पुर्तता करण्यात येणार आहे. शाळा विकासासाठी आवश्यकता निधीसहीत सदर माहितीच्या आधारे सन २०२५-२०२६ चा आराखडा तयार करून जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती, पुणे यांना सादर करायचा आहे.

आवश्यक सुविधा

शाळा इमारत मोठी दुरुस्ती (भिंत, दरवाजे, छत, खिडक्या इ. बाबी)
नवीन वर्ग खोली बांधकाम,
ग्रंथालयात रॕक सुविधा उपलब्ध करून देणे
शालेय विद्युतीकरण
बोलक्या भिंती
डिजिटल बोर्ड
विद्यार्थ्यांसाठी बसण्याची व्यवस्था
पिण्याच्या पाण्याची सुविधा
पाणी साठविण्यासाठी टाकी
मुला-मुलींसाठी स्वतंत्र व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र मुबलक पाणी असणारे स्वच्छतागृह,
संरक्षक भिंतीसह वृक्ष लागवडीसाठी आवश्यक असणारे कुंपण,
क्रीडांगण विकास,
Bharat Internet, Diksha & Infosys app),
प्रयोगशाळा, ग्रंथालय, संगणक कक्ष (स्वतंत्र खोली),
रॅम्प वुईथ हॅन्डरेल,
शाळा परिसर सुशोभीकरण,
परसबाग

पुणे जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हा परिषद पुणे यांच्या माध्यमातून प्रत्येक केंद्रातून एक आदर्श शाळा निवडणे आणि बहुतेक अत्याधुनिक दृष्टीने शाळा परिपूर्ण करणे हा उपक्रम स्तुत्य असून यामुळे बदलत्या काळानुसार प्राथमिक शिक्षण परिपूर्ण होण्यास मदत होईल. भविष्यात समृद्ध शिक्षणासाठी अनावश्यक माहिती यांचा अतिरेक थांबवणे आणि आदर्श शाळा योजनेची व्याप्ती वाढवणे गरजेचे आहे.
- शांताराम जगताप, सभापती, कर्मयोगी सुभाषअण्णा कुल प्राथमिक शिक्षक पतसंस्था, दौंड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आरोग्यमंत्र्यांच्या माहितीचा बुरखा टराटरा फाटला, घाटीमध्ये रेबीजच्या लसीचा तुटवडा; रुग्णांना मोठा भुर्दंड

Latest Marathi Update : राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता

Phaltan LPG Gas Shortage: फलटणमध्ये जादा दराने सिलिंडरची विक्री; गॅस एजन्सीसमोर लांबच लांब रांगा; ग्रामीण भागात पुन्हा पेटल्या चुली

'मला जो सिनेमा मिळायचा तो तिला हवा होता' रंजना देशमुखबद्दल पहिल्यांदाच बोलल्या उषा चव्हाण, म्हणाल्या...'स्पर्धा होती पण...'

Satara Panchayat Election: सातारा जिल्ह्यात आज सभापतींच्‍या निवडी

SCROLL FOR NEXT