राजेगाव, ता. १४ ः स्वामी-चिंचोली (ता.दौंड) गावच्या सरपंच पूनम मदने व ग्रामविकास अधिकारी स्वाती लोंढे-चव्हाण यांना ‘पर्सन ऑफ द ईअर २०२४’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
आदर्श फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने कोल्हापूर येथील राजश्री शाहू महाराज भवन येथे महिलादिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात राधानगरी भुदरगडचे माजी आमदार बजरंग देसाई यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला आहे. संस्थेचे अध्यक्ष विजय लोहार यांनी मनोगत व्यक्त केले. आदर्श फाउंडेशन सामाजिक सेवाभावी संस्था दरवर्षी विविध क्षेत्रांतील ५० मान्यवरांचा सन्मान करते. त्यामध्ये ग्रामविकास या विभागासाठी सरपंच पूनम मदने व ग्रामविकास अधिकारी स्वाती लोंढे-चव्हाण यांची निवड केली. सरपंच मदने, स्वाती लोंढे-चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.