राजेगाव, ता. ३० : ग्रामीण भागातील ई-पीक पीक पहाणी ॲप आयओएस प्रणाली आयफोनमध्ये उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. सध्या तरी ही सुविधा फक्त ‘ॲन्ड्रॅाईड’ प्रणाली आधारित मोबाईल मध्येच उपलब्ध आहे.
ग्रामीण भागात आज आयओएस प्रणाली आधारित आयफोन वापरणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. परंतु सदर ई पीक पाहणी ॲप आयओएस प्रणाली आयफोनमध्ये उपलब्ध नसल्याने, स्वतःला ई-पीक पाहणी करता येत असून, सुद्धा अनेक शेतकऱ्यांना ई पीक पाहणीसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागत आहे.
आर्थिक वर्षाचा शेवट होत असताना, राज्यातील ग्रामीण भागातील जिल्हा बॅंका तसेच गाव पातळीवरील कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमध्ये (सोसायटी) शेतकऱ्यांची पीक कर्ज भरण्याची लगबग सुरू आहे तर दुसरीकडे लागलीच नव्याने पीक कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांची कागदपत्रांची पूर्तता करण्याची धावपळ उडाली आहे. अशातच चालू हंगामातील सातबारा उताऱ्या वरील पीक पाहणी नोंदणी अनिवार्य आहे.
ग्रामीण भागातील नवीन पिढीतील अनेक शेतकरी-प्रगतशील बागायतदार ‘आयओएस’ प्रणाली आधारित आयफोन वापरतात. परंतु सदर ई पीक पाहणी ‘ॲप’, आयओएस प्रणाली आधारित आयफोनमध्ये उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांना शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणी करण्यास अडचण निर्माण होते किंवा दुसऱ्यावर अवलंबून रहावे लागते.
ई पीक पाहणी ॲप आयओएस प्रणाली आधारित आयफोनमध्ये उपलब्ध नसल्याने, स्वतःला ई- पीक पाहणी करता येत असून सुद्धा शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणीस दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागत आहे. यासंदर्भात मी स्वतः राज्याचे कृषी मंत्री तसेच कृषी अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या अधिकृत ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) हॅंडल वर त्यांना अवगत केले आहे.
-पद्माकर कांबळे, रावणगाव ता.दौंड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.