पुणे

खानवटे येथील नैसर्गिक पाण्याचे प्रवाह मोकळे

CD

राजेगाव, ता. २० ः खानवटे (ता. दौंड) येथील गेले अनेक वर्षे बंद झालेले नैसर्गिक पाण्याचे प्रवाह मोकळे करण्यात प्रशासनाला यश आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तहसीलदार अरुण शेलार यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. एका स्थानिक रहिवाशाच्या तक्रारीनंतर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत हा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावला. यामुळे गावातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
​मागील काही वर्षांपासून गावातील नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अनेक ठिकाणी अडकल्याने पावसाळ्यात मोठी समस्या निर्माण होत होती. गट क्र. २८८ मध्ये अडकलेल्या प्रवाहामुळे बापू झोड यांच्या घरात पावसाचे पाणी शिरत होते. या सततच्या त्रासामुळे त्रस्त होऊन त्यांनी प्रशासनाकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत तहसीलदार शेलार यांनी गावकऱ्यांच्या हितासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यांच्या निर्देशानुसार संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. नंतर गट क्रमांक २८८ मध्ये सहा फूट खोल आणि ९०० फूट लांब चारी खोदून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह मोकळा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कामासाठी प्रशासनाने आवश्यक ती यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ उपलब्ध करून दिले. या मोहिमेमध्ये अनेक अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. सर्व अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करत पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
​प्रवाहातील अडथळे दूर झाल्यानंतर पाण्याचा मार्ग मोकळा झाला आणि पाणी योग्य दिशेने वाहू लागले. यामुळे गावातील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरणार नाही. अनेक वर्षांपासूनचा हा प्रश्न सुटल्यामुळे गावातील ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.
यावेळी नायब तहसीलदार नम्रता भंडारी, ग्रामविकास अधिकारी एस. ए. शिंदे, मंडळ अधिकारी महेंद्रसिंग भोई, भूमापक अधिकारी सागर ओरंगे, ग्राम महसूल अधिकारी अजित पाटील, सरपंच अनिता पवार, पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण
गावातील एका रहिवाशाने सांगितले की, दरवर्षी पावसाळ्यात घरात पाणी शिरल्यामुळे मोठे नुकसान व्हायचे. अनेकवेळा प्रशासनाकडे विनंती करूनही काहीच कार्यवाही होत नव्हती. पण यावेळी तहसीलदारांनी तातडीने दखल घेऊन ही समस्या कायमची मिटवली. यामुळे आम्ही सर्वजण समाधानी आहोत.

01356

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चीनच्या पुन्हा कुरापती, 'मॅकमोहन लाइन'च्या ४० किमीवर एअरबेस; अरुणाचलपासून १०० किमीवर विमानांसाठी ३६ हँगर

Shreyas Iyer: आता तर त्याला सोबतच घरी घेऊन जाऊ! सूर्यकुमार यादवने दिले श्रेयसच्या प्रकृतीचे अपडेट्स, मित्राची अवस्था पाहून...

Organic Banana Success : सोनईची केळी 'दुबई'च्या बाजारपेठेत; भुसारी परिवाराचे कौतुक; सेंद्रिय शेतीने अधिक उत्पन्नाची गोडी

Latest Marathi News Live Update : एकनाथ खडसे यांच्या घरी चोरी

Solapur Accident:'टेंभुर्णी-पंढरपूर रोडवरील अपघातात २ मजुरांचा मृत्यू'; अज्ञात वाहनाची धडक, हातावर पोट अन्..

SCROLL FOR NEXT