पुणे

कृषी पंप, केबल चोरांना धडा शिकवा

CD

राजेगाव, ता. ९ ः स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथील शेतातून चोरीला गेलेले कृषीपंप इतर साहित्य चोरांना धडा शिकवा, अशी मागणी बाधित शेतकऱ्यांनी दौंड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गेल्या सहा महिन्यांपासून आमच्या शेतातील कृषी पंप आणि इतर साहित्यांची मोठ्या प्रमाणात चोऱ्या झालेल्या आहेत. चोर शिवार बदलून सतत चोऱ्या करत आहेत. या चोऱ्यांमागे गावातील चोर असण्याची आमच्या मनात शंका आहे. कारण कोणत्या शेतात कोण कधी असतं याची माहिती काढून नंतर चोरी झाल्याच्या बहुतेक घटना घडल्या आहेत. त्यासंबंधी आम्ही रावणगाव पोलिस चौकीत वारंवार तक्रारीही दिल्या आहेत. परंतु, तेथील प्रशासन आमच्याकडून फक्त लेखी अर्ज घेऊन वाटाण्याच्या अक्षता लावत आहेत. त्यामुळे शेतकरी या चोरांना अक्षरश: वैतागून गेले आहेत. या चोरांच्या साथीला गावातील काही भुरटे चोरही असण्याची शंका बळावली जात आहे. तसेच, हा चोरीच्या मालात भिगवण आणि खडकी परिसरातील काही भंगार दुकानदार ही सहभागी असणार आहेत. तरी या प्रकरणात लक्ष घालून सखोल ‌चौकशी करावी व चोरांवर अत्यंत कठोर कारवाई करावी. आपण यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ केली अथवा या प्रकरणातून कोणाला सोडलं तर बाधित शेतकरी पुणे पोलिस अधिक्षक कार्यालयात जाणार आहोत. या प्रकरणातील मुख्य सुत्रधारास अटक केल्यास चौकशी अंती अनेक सहकारी सापडणार आहेत. त्या सर्वांना पकडून आम्हा शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही अपेक्षा. निवेदनावर बाधित २४ शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs WI : भारतीय संघाने टॉस जिंकला, सूर्याने अचंबित करणारा निर्णय घेतला; प्रेक्षकांमध्ये थोड्यावेळासाठी सन्नाटा...

Iran Israel War: मध्य पूर्वेतील संघर्षाचा फटका बसणार! भारतात गॅस सिलेंडरचे दर वाढणार? एलपीजी ग्राहकांची चिंता वाढली

Viral Video : 'स्वतः कर्णधारपद सोडणार की PCB हकालपट्टी करणार?' पाकिस्तानी पत्रकाराचा थेट प्रश्न, सलमान अली आघा म्हणाला...

Mumbai News: घरेलू कामगारांचा सरकारला अल्टिमेटम, अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतुदीची करावी; नेमक्या मागण्या काय?

T20 WC, SA vs ZIM: दक्षिण आफ्रिकेचा सलग सातवा विजय... उपांत्य फेरीत न्यूझीलंडला भिडणार; दुसऱ्या Semi मध्ये इंग्लंड विरुद्ध....

SCROLL FOR NEXT