पुणे

केवायसी होऊनही अनुदान रखडले

CD

राजेगाव, ता. १३ ः अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मिळणारे पीक अनुदान राजेगाव (ता. दौंड) येथील बाधित शेतकऱ्यांसाठी अद्यापही मृगजळ ठरले आहे. प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होऊनही, या भागातील शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडल्याने बळिराजा मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
मागील वर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे राजेगाव परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त पिकांचे प्रशासकीय स्तरावर तातडीने पंचनामे केले होते. सरकारने अनुदानाचे वितरण लवकरच सुरू होईल, असे आश्वासन दिल्यावर, या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी धावपळ करून आवश्यक असलेली ‘केवायसी’ प्रक्रिया देखील पूर्ण केली.
पंचनामे झाले, केवायसी झाली, तरीही अनुदानाची रक्कम खात्यावर जमा न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. नागरिकांचे झालेले नुकसान पाहता त्यांना तत्काळ मदत मिळणे अपेक्षित होते. मात्र, नुकसानीनंतर पीक हातातून गेले आणि शासनाची मदतही मिळाली नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत.
पेरणी आणि पुढील शेतीकामांसाठी आवश्यक असलेला पैसे नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासनाकडून मदतीची आशा असताना, वारंवार पाठपुरावा करूनही अनुदान न मिळाल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या अनुदानाच्या वितरणावर लक्ष केंद्रित करून प्रशासनाने तत्काळ निधी जमा करावा, अशी मागणी बाधित शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Mayor Salary : देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असणाऱ्या मुंबईच्या महापौरांना किती मिळतो पगार?

Devendra Fadnavis : "खिशात नाही आणा अन बाजीराव म्हणा"; देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना खोचक टोला!

विदर्भात काळीज पिळवटणारी घटना! कडाक्याच्या थंडीत काळ्या बॅगमध्ये आढळली ८ दिवसांची चिमुकली, आई वडिलांचा शोध सुरु

Video: मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांने इतका जोरात सिक्स मारला की CSK च्या फॅनच्या गालाला झालं फ्रॅक्चर

Latest Marathi News Live Update : रॅलीत झेंडा विजेच्या तारेस लागून स्फोट, कार्यकर्ता गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT