पुणे

स्नेह, जिव्हाळा वाढविणारा मकर संक्रांत सण

CD

राजेगाव, ता. १४ : मकर संक्रांत म्हणजे स्नेह, जिव्हाळा आणि आपुलकी वाढवणारा सण. हा सण बुधवारी (ता. १४) मोठ्या उत्साहात, आनंदात साजरा करण्यात आला. दुपारी तीननंतर मुहूर्त असल्याने दुपारनंतर मंदिरांत महिलांची गर्दी झाली होती. मकरसंक्रांतीच्या निमित्ताने महिलांनी एकमेकींना ओवसा घेऊन जाण्याची परंपरा आहे. ही प्रथा सौहार्द, सौभाग्य आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक मानले जाते.
ओवसामध्ये तीळ, गूळ, हलकं धन, फळं आणि सौभाग्यवती महिलेला लागणाऱ्या वस्तू असतात. राजेगाव (ता. दौंड) येथे जुन्या व नव्या गावातील ग्रामदैवत राजेश्वर मंदिर आणि परिसरातील वाड्यावस्त्यांवरील सर्व छोटी मोठी मंदिरे दिवसभर दर्शनासाठी खुली होती. परिसरातील सुवासिनींनी सर्वच मंदिरात ओवसायला गर्दी केली होती. नववर्षाच्या आगमनानंतरच पहिला सण म्हणजेच मकर संक्रांत. ‘तिळगूळ घ्या गोड गोड बोला,’ असे म्हणत एकमेकांसोबत आपुलकीचे, जिव्हाळ्याचे नाते दृढ केले जाते. घराघरांत आनंद बहरतो अन् सगळेजण एकत्र येऊन सण साजरा करतात. यंदाही बुधवारी प्रसन्न वातावरणात हा सण साजरा केला गेला. घराघरांमध्ये पारंपरिक आणि विधिवत पद्धतीने पूजाअर्चा करून एकमेकांसोबत हा सण आनंदाने साजरा केला गेला. घरोघरी पुरणपोळी पंचपक्वानांचा बेत केला होता. एकमेकांना तिळगूळ देऊन स्नेहाचे, आनंदाचे बंध जोडण्यात आले.
सणाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच मंगळवारी (ता.१३) खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये लगबग पाहायला मिळाली. पूजेच्या साहित्यांपासून ते तिळगूळ खरेदीपर्यंत, फुलांच्या खरेदीपासून ते सुगडी खरेदीपर्यंत महिला-तरुणींनी खरेदीचे निमित्त साधले. रांगोळी, लहान मुलांचे लागणारे दागिने आणि हलव्याच्या दागिन्यांचीही खरेदी जोमाने करण्यात आली. सगळीकडे हर्षोल्हासाचे वातावरण पाहायला मिळाले. या सणाच्या निमित्ताने मंगळवारी ठिकठिकाणच्या बाजारपेठांमध्ये खरेदीची लगबग दिसून आली. महिला-तरुणींनी सुगडी, गाजर, बोरे, उसाची पेरे, शेंगा, कापूस, हरभरे, पाच फळे, तिळगूळ तसेच हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमासाठी लागणारे वाण, पूजेचे साहित्य आणि पूजेसाठी लागणाऱ्या फुलांची खरेदी केली. तिळाची वडी, तिळाचे लाडू, गुळाच्या वड्या, तिळाचा हलवा याच्या खरेदीसाठीही दुकानांमध्ये लगबग पाहायला मिळाली. मकर संक्रांतीसाठी नवीन कपडे आणि त्याला साजेसे दागिनेही खरेदी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

voting without voter ID : मतदार ओळखपत्र नसले तरीही करता येणार मतदान, जाणून घ्या कसं?

Big Blow: भारताच्या स्टार खेळाडूची IND vs NZ ट्वेंटी-२० मालिकेतूनही माघार; वर्ल्ड कप स्पर्धेतील सहभागावर प्रश्नचिन्ह

Iran Calls India : अमेरिकेकडून हल्ला होण्याची भीती असताना, इराणने भारताला केला फोन अन्...

MCA: मुंबई क्रिकेटचा मोठा निर्णय! रोहित - रहाणेसह IPL खेळणाऱ्या खेळाडूंना देणार नाही करार; कारण घ्या जाणून

Visa Suspend: अमेरिकेचा मोठा निर्णय! रशिया, इराणसह ७५ देशांसाठी व्हिसा प्रक्रिया थांबवली; भारत आणि पाकिस्तानचं काय? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT