पुणे

भीमा नदीच्या पाणी पातळीत घट

CD

राजेगाव, ता.१० : दौंड तालुक्याच्या पूर्व भागातून वाहणाऱ्या भीमा नदीच्या पाणी पातळीत मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात घट झाली आहे. वाटलूज, नायगाव परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. नदीपात्रातील पाणी आटल्यामुळे शेतीपंप खाली घेण्यासाठी नदीकाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे.

पाणी पातळी घटण्याचा सर्वाधिक फटका दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील वाटलूज, नायगाव, मलठण, हिंगणीबेर्डी, शिरापूर आणि देऊळगाव राजे परिसरातील शेतकऱ्यांना बसला आहे. पाणी कमी झाल्याने नदीपात्रातील अनेक ठिकाणी शेतीपंप व पाइपलाइन फुटबॉल उघड्यावर पडले आहेत.
पाण्याअभावी गहू, हरभरा व कांदा आदी पिके सुकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक शेतकऱ्यांना पिके वाचवण्यासाठी पर्यायी पाण्याच्या स्रोतांचा शोध घ्यावा लागत आहे. काही शेतकरी विहिरींचा आधार घेत आहेत तर काहींनी नदीपात्रात पाणी असेपर्यंत शेतीपंप चालवण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू ठेवले आहेत. यासाठी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक खर्च सहन करावा लागत आहे.
उजनी धरणातील पाणलोट क्षेत्रातील पाणी हे करमाळा, इंदापूर, कर्जत, दौंड, श्रीगोंदा या तालुक्यातील शेतीसाठी वरदान आहे. दौंड तालुक्यातील पूर्व भागातील नदी किनारी असणारी गावे खानवटे, राजेगाव, नायगाव, वाटलूज, मलठण, हिंगणी बेर्डी, काळेवाडी, शिरापूर, देऊळगाव राजे, पेडगाव, वडगाव दरेकर, आलेगाव इत्यादी गावांना उजनीचे पाणी मिळत असल्याने या गावाची शेती सुजलाम्‌ सुफलाम्‌ झाली आहे. हा भाग अंतिम टोकाला (टेल) असल्याने खडकवासला कालव्याचे पाणी या भागात येत नाही. अथवा जरी आले तरी टोकाचा भाग असल्याने या भागात पुरेशा प्रमाणात पाणी पोचत नाही. त्यामुळे या गावातील शेतकरी उजनी धरणातील पाण्यावरच आपली शेती करतो. या गावातील अर्थकारणच उजनीच्या पाण्यावरच अवलंबून आहे.

यंदा भीमा नदीच्या पात्रातील पाणी लवकरच कमी होऊ लागले आहे. पाणी कमी झाल्याने नदीपात्रातील अनेक ठिकाणी शेतीपंप उघड्यावर पडले आहेत. सध्या गहू, हरभरा व कांदा ही पिके अंतिम टप्प्यात असताना पाण्याअभावी गंभीर भोगावे लागणार आहेत.
- बापूराव देवकाते, शेतकरी, मलठण (ता. दौंड)

01650

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC: मुंबईकरांची प्रतीक्षा वाढणार, अभय योजनेसाठी सुधारित नियमावली आणणार; ओसी मिळण्याबाबत पालिकेचा मोठा निर्णय

MI vs SRH : रायन रिकल्टनचे विक्रमी शतक! मुंबईने IPL 2026 मधील सर्वोच्च धावसंख्येची संधी गमावली; हार्दिक, जॅक्सची तुफान फटकेबाजी

Bengaluru Wall Collapse : पावसापासून वाचण्यासाठी भिंतीचा आसरा घेतला अन् काळानं घाला घातला! अंगावर भिंत कोसळून 7 जणांचा दुर्दैवी अंत, दोन लहान मुलांचाही समावेश

Pune News : भाजपच्या आणखी दोन नगरसेविकांमधील वाद चव्हाट्यावर; शहरातील नेत्यांचे दुर्लक्ष

MI vs SRH Live: मौके पे चौका... मिळालेल्या संधीचं सोनं! वानखेडेवर धुमाकूळ; झळकावलं मुंबई इंडियन्सकडून Fastest Hundred

SCROLL FOR NEXT