पुणे

‘मुलांचा स्क्रीन टाइम कमी करणे गरजेचे’

CD

रांजणगाव सांडस, ता. १३ ः सध्या मुलांची उन्हाळी सुटी सुरू आहे. सुटीत मुलांनी मोबाईल आणि टीव्हीपासून मुक्त राहावे यासाठी पालकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. पालक आणि शिक्षकांसमोर असलेल्या अनेक आव्हानांपैकी हे आव्हान उन्हाळी सुट्टीमध्ये अधिक दिसून येत आहे. आज अनेक कुटुंबातल्या बहुतांश मुलांकडे स्वतःचा मोबाईल आहे. स्क्रीन टाइममध्ये ते वापरत असलेला स्मार्टफोन, टॅब्लेट, आयपॅड किंवा संगणकही असू शकतो. पालक आपली मुले इतकी स्मार्ट आहेत, की त्यांना ती साधने वापरता येतात याचा अभिमान बाळगतात. मात्र, हे तंत्रज्ञान अतिशय हानिकारक आहे, हे आपल्याला माहीत आहे का?. अनेक पालक मुलांना आनंदानं मोबाईलही घेऊन देतात, पण पालक घरी नसताना व असतानाही मुलं काय पाहतात याकडे आपले लक्ष आहे का, याचाही गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. मुलांना उत्तम प्रकारची उन्हाळी सुट्टी घालवण्यासाठी छंद वर्ग, शिबिरे, खेळ प्रशिक्षणे, कला वर्गाची गरज आहे.


बालपण हरवतंय...
पालक दप्तरांचे ओझे वाहणाऱ्या मुलांकडून उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये नको तितक्या अपेक्षा करत आहेत. आपली मुले सर्व बाबतीत अपडेट असायला हवीत यासाठी त्यांच्या वयाचा विचारही न करता त्यांना न पेलवणारे कोर्स करायला लावणे, कॉम्प्युटरच्या जमान्यात मुले मागे पडू नयेत म्हणून विविध कोर्समध्ये गुंतवून त्यांचे बालपण हिरावत आहेत.

घराघरांमध्ये लहान मुले पाहत असलेला मोबाईल आणि टीव्ही याचा एकूण स्क्रीन टाइम हा पालकांसाठी डोकेदुखीचा विषय ठरत आहे. त्यामुळे मुलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. हा स्क्रीन टाइम कमी होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे.
डॉ. नीलिमा विशाल कोकरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : योगी आदित्यनाथ यांची काँग्रेसवर टीका; म्हणाले, काँग्रेसची जिझिया कर लावण्याची इच्छा

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT