पुणे

रांजणगाव सांडसमध्ये विवाहितेचा शॉक देऊन खून

CD

रांजणगाव सांडस, ता. ३ : रांजणगाव सांडस (ता. शिरूर) येथील रणपिसे वस्तीवरील राहत्या घरी नवविवाहितेचा दोरीने गळा आवळून व हाताला विजेचा शॉक देऊन खून केला. शीतल स्वप्नील रणपिसे (वय २१), असे तिचे नाव आहे. स्वप्नील हिचे पती स्वप्नील श्‍यामराव रणपिसे, सासू व माजी सरपंच शारदा श्‍यामराव रणपिसे हे शेतामध्ये गेले होते. तर, सासरे श्‍यामराव पांडुरंग रणपिसे हे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. शीतल ही घरामध्ये एकटीच होती. या संधीचा फायदा घेऊन दुपारी दीड ते दोनच्या दरम्यान तिचा खून झाल्याची शंका आहे.
पोंढे (ता. पुरंदर) येथील दत्तात्रेय रघुनाथ वाघले यांची कन्या असलेल्या शीतल हिचा विवाह ३ डिसेंबर २०२३ रोजी रांजणगाव सांडस येथील श्यामराव पांडुरंग रणपिसे यांच्या मुलगा स्वप्नील यांच्याशी झाला होता. या दोघेही नवदांपत्याचा संसार सुखी चालला होता. कुठल्याही प्रकारचे घरामध्ये वाद-विवाद नव्हते. परंतु, बुधवारी दुपारी शीतल हिचा खून झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. श्यामराव रणपिसे यांच्या घरी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह श्वान पथकाने भेट दिली असून, चौकशी करत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम यवत पोलिस ठाणे येथे सुरू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT