रांजणगाव सांडस : उरळगाव (ता. शिरूर) येथे निमोणे (ता. शिरूर) प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने मंगळवारी (ता. १८) येथील न्यू इंग्लिश स्कूल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंगणवाडी शाळांत जेई (जापनीज मेंदूज्वर) प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत एक ते पंधरा वयोगटातील बालकांना लसीकरण केले. मंगळवारी उरळगावातील बालकांचे लसीकरण पूर्ण केल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मिनाज शेख यांनी सांगितले. राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत उरळगावातील अंगणवाडी, प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालयामधील एक ते पंधरा वयोगटातील बालकांना मोफत लसीकरण केले आहे. निमोणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने हे लसीकरण राबविले. या मोहिमेचे उद्घाटन सरपंच भाग्यश्री अमोल होलगुंडे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी के. डी. मिसाळ, कैलास खंडागळे, विक्रम सस्ते, कलाशिक्षक आनंद करडे, स्वाती सात्रस, हसीना जकाते, रेश्मा धरणे, गोवर्धन घायतडक आदी उपस्थित होते.
या लसीकरण मोहिमेअंतर्गत न्यू इंग्लिश स्कूलमध्ये १७७, अंगणवाडी शाळा क्र. १-२३, अंगणवाडी शाळा क्र. २-४८, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - ९८, होलगुडे वस्ती प्राथमिक शाळा - २०, अंगणवाडी शाळा - २४ या शाळांतील बालकांना प्रबंधक लसीकरण केले. या मोहिमेमध्ये डी. ए. मारणे, डी. डी. देवळे, आरोग्य सेविका शीला निचित, ज्योती सोलाट, वर्षा जाधव, मनीषा जांभळकर, लक्ष्मी चव्हाण, रोहिणी चव्हाण यांनी लसीकरणासाठी सहभाग घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.